शाओमी Mi 5: आजपासून होणार सेलसाठी उपलब्ध

शाओमी Mi 5: आजपासून होणार सेलसाठी उपलब्ध
HIGHLIGHTS

पहिल्या सेलमध्ये फोनसह Mi प्रोटेक्ट सर्विससुद्धा उपलब्ध होईल. सध्यातरी तुम्ही ४९९ रुपयांत ही सेवा घेऊ शकतात. तथापि त्यानंतर ह्या सेवेसाठी आपल्याला ६९९९ रुपये मोजावे लागतील.

मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपला नवीन फोन शाओमी Mi 5 लाँच केला होता. कंपनीने भारतीय बाजारात आपल्या ह्या फोनची किंमत २४,९९९ रुपये ठेवली आहे. आज हा फोनचा पहिला सेल आहे. ह्या फोनला कोणत्याही रजिस्ट्रेशनशिवाय खरेदी करु शकता. तथापि सुरुवातीला हा फोन कंपनीची अधिकृत साइट Mi.com वर उपलब्ध होईल.

 

पहिल्या सेलमध्ये फोनसह Mi प्रोटेक्ट सर्विससुद्धा उपलब्ध होईल. सध्यातरी तुम्ही ४९९ रुपयांत ही सेवा घेऊ शकतात. तथापि त्यानंतर ह्या सेवेसाठी आपल्याला ६९९९ रुपये मोजावे लागतील.

शाओमी Mi 5 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.15 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. ही डिस्प्ले कर्व्ह्ड 3D सेरामिक ग्लाससह येते. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 428ppi आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्र्रॅगन 820 प्रोसेसर, एड्रेनो 530 GPU आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे.

हेदेखील पाहा- ह्या अॅप्सच्या माध्यमातून भारतातील प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट

त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा कॅमेरा फेज डिटेक्शन ऑटोफोकससह येतो. ह्या फोनने 4K व्हिडियो रेकॉर्डिंगसुद्धा केली जाऊ शकते. ह्या फोनमध्ये 4 अल्ट्रपिक्सेल फ्रंट कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्या फोनचा आकार 144.5×69.2×7.25mm आणि वजन 129 ग्रॅम आहे. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन क्विक चार्जिंग फीचरने सुसज्ज आहे. फोनमध्ये टाइप-C USB पोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय 802.11 A/B/G/AC, ब्लूटुथ 4.2, ग्लोनास आणि NFC आहे.

चीनमध्ये ह्या स्मार्टफोनला 32GB आणि 64GB अशा प्रकारात लाँच केले गेले होते. त्याचबरोबर ह्यात 3D ग्लास बॅकसह लाँच केले गेले होते. ह्याचा एक 128GB चा प्रकारसुद्धा लाँच केला गेला होता, जो एक 3D सेरामिक बॉडीने सुसज्ज होता.

हेदेखील वाचा – अॅप्पल आयफोन SE 64GB ची भारतात किंमत असेल ४९,००० रुपये

हेदेखील वाचा – १६ मेगापिक्सेलने सुसज्ज असलेला मिजू MX5E स्मार्टफोन ऑनलाइन साइटवर लिस्ट

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo