Xiaomi Mi 4 You सेल 10 जुलै ला होईल सुरू, फक्त 4 रुपयांमध्ये विकत घेता येतील काही प्रोडक्ट्स

Xiaomi Mi 4 You सेल 10 जुलै ला होईल सुरू, फक्त 4 रुपयांमध्ये विकत घेता येतील काही प्रोडक्ट्स
HIGHLIGHTS

या सेल मध्ये कंपनी “Rs 4 फ्लॅश सेल”, “ब्लिंक एंड मिस डील्स”, “12 PM ब्लॉकबस्टर्स”, “Mi एनिवर्सरी स्पेशल्स”, आणि “ग्रॅब कूपन्स” या डील्स घेऊन येत आहे.

Xiaomi Mi 4 You sale will start from july 10, can buy some products for four rupees: Xiaomi ने 2014 मध्ये Xiaomi Mi 3 सह भारतीय बाजारात आपले पहिले पाऊल टाकले होते आणि कंपनीला यश मिळाल्या नंतर आता पर्यंत कंपनी ने अनेक स्मार्टफोंस भारतीय बाजारात सादर केले आहेत. Xiaomi मागील 4 वर्षांपासून भारतीय बाजारात स्मार्टफोन निर्मात्यांना टक्कर देत आहे ज्यात लोकल आणि चीनी निर्मात्यांचा पण समावेश आहे. मागच्या वर्षी प्रमाणे कंपनी ने यावेळी पण एनिवर्सरी सेलिब्रेशन सेल आयोजित केला आहे. कंपनी ने घोषणा केली आहे की Mi4You सेल इवेंट 10 जुलै ते 12 जुलै पर्यंत चालेल. 

हा सेल 10 जुलै ला संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल ज्यात अनेक चांगल्या चांगल्या डील्स मिळतील. Mi इंडिया वेबसाइट वर Mi4You वेबसाइट नुसार कंपनी “Rs 4 फ्लॅश सेल”, “ब्लिंक एंड मिस डील्स”, “12 PM ब्लॉकबस्टर्स”, “Mi एनिवर्सरी स्पेशल्स”, आणि “ग्रॅब कूपन्स” या डील्स घेऊन येत आहे. कंपनी ने यात एका गेमचा समावेश केला आहे ज्याचे नाव “फाइंड द हिडन 4’s” ठेवण्यात आले आहे जो मोबाइल गेम सोबत लिंक होतो आणि हा फक्त एंड्राइड व iOS वर Mi स्टोर द्वारा एक्सेस केला जाऊ शकतो. या गेम मध्ये यूजर्सना “4” अंक शोधावा लागेल. असे केल्यास यूजर्स Mi MIX 2, Redmi Y2 आणि इतर अनेक चांगले प्राइजेस जिंकू शकतात. 
Rs 4 फ्लॅश सेल या सेल मधील सर्वात शानदार सेल ठरू शकतो कारण हा सर्व Mi फॅन्स साठी असेल आणि हा खास असण्याचे कारण हे आहे की Xiaomi इंडिया Mi LED Smart TV 4 सारखे प्रोडक्ट फक्त 4 रुपयांमध्ये सादर करेल ज्याची खरी किंमत 44,999 रूपये आहे. 

Xiaomi Mi4You Rs 4 फ्लॅश सेल
तसेच Mi बॉडी कम्पोजीशन स्केल 1,999 रूपयांच्या ऐवजी फक्त 4 रुपयांमध्ये उपलब्ध होईल, Redmi Note 5 Pro स्मार्टफोन 14,999 रूपयांच्या ऐवजी 4 रूपये, Redmi Y1 स्मार्टफोन 8,999 रूपयांच्या ऐवजी 4 रूपये, Redmi Y2 स्मार्टफोन 8,999 रूपयांच्या ऐवजी 4 रूपये, Xiaomi Mi Band 2 1,799 रूपयांच्या ऐवजी 4 रुपयांमध्ये उपलब्ध होतील. हा फ्लॅश सेल 10,11 आणि 12 जुलै ला संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल. आम्हाला माहीत नाही की कंपनी सेल मध्ये किती प्रोडक्ट्स चा समावेश करेल पण 4 रुपये ही किंमत अनेकांना आकर्षित करू शकते. 

Xiaomi ब्लिंक एंड मिस डील्स
कंपनी हे तिन दिवस संध्याकाळी 6 वाजता बंडल डील्स पण सादर करेल, ज्यात प्रोडक्ट्स वर डिस्काउंट पण मिळेल. वेबसाइट नुसार, यूजर्स 3,798 रूपयांच्या ऐवजी 1,999 रुपयांमध्ये Mi Body Composition Scale आणि Mi Band 2 विकत घेऊ शकतात. तसेच Redmi Note 5 आणि Mi VR Play 2 11,298 रूपयांच्या ऐवजी 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल आणि Redmi Y1 सोबत Mi ब्लूटूथ हेडसेट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. इतर डील्स मध्ये Mi Air Purifier 2 एका फिल्टर सह 8,999 रुपयांमध्ये मिळत आहे, तर Xiaomi पॉकेट स्पीकर आणि इयरफोन बेसिक 1,898 रूपयांच्या ऐवजी 1,499 रुपयांमध्ये मिळेल. या सेल मध्ये तुम्ही 10,000mAh Mi Power Bank 2i आणि Mi Rollerball Pen 1,078 रूपयांच्या ऐवजी 899 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. या सेल मध्ये प्रत्येक बंडल चे 200 यूनिट उपलब्ध होतील पण Mi Air Purifier 2 आणि याच्या फिल्टर चे फक्त 50 यूनिट सेल मध्ये उपलब्ध होतील. 

Xiaomi Mi एनिवर्सरी स्पेशल्स
कंपनी सेल मध्ये रोज दुपारी 12 वाजता Mi LED Smart TV 4, आणि Redmi Note 5 Pro पण सेल साठी सादर करेल. पण हे माहीत नाही की हे डिवाइसेज पण डिस्काउंट सह सादर केले जातील की नाही. कंपनी Xiaomi Mi MIX 2 ला 2,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 27,999 रुपयांमध्ये सादर करेल. त्याच बरोबर Xiaomi Mi Max 2, ट्रॅवल बॅग, Mi इयरफोंस आणि Mi बँड इत्यादी वर पण डिस्काउंट दिला जाईल. 

Mi4You ग्रॅब कूपन्स
Xiaomi रोज सकाळी 10 वाजता यूजर्सना कूपन्स मिळवण्याची संधी देईल ज्याचा वापर यूजर्स प्रोडक्ट विकत घेताना करू शकतात. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo