10GB रॅम सह येईल Xiaomi चा पहिला 5G फोन, Xiaomi Mi Mix 3

10GB रॅम सह येईल Xiaomi चा पहिला 5G फोन, Xiaomi Mi Mix 3
HIGHLIGHTS

Xiaomi Mi Mix 3 जगातील पहिला असा मोबाईल फोन असेल जो 10GB रॅम सह येईल आणि सोबतच हा पहिल्या काही 5G फोन्स पैकी एक असेल.

शाओमी आपला आगामी Mi Mix 3 स्मार्टफोन खूप दिवसांपासून टिज करत आहे जो 25 ऑक्टोबरला बीजिंग मध्ये लॉन्च केला जाईल. या मोबाईल फोन बद्दल नवीन टीजर्स पण समोर येत आहेत ज्यातून माहिती मिळाली आहे की हा डिवाइस जगातील पहिल्या काही 5G स्मार्टफोन्स पैकी एक असेल. त्याचबरोबर अशी पण माहिती समोर आली आहे की Xiaomi Mi Mix 3 जगातील पहिला असा मोबाईल फोन असेल जो 10GB रॅम सह येईल. 

हा 5G स्मार्टफोन 25 ऑक्टोबरला लॉन्च केला जाईल आणि आपण असे म्हणू शकतो की Mi Mix 3 पहिला असा स्मार्टफोन असेल जो 5G स्पीडला सपोर्ट करेल. पुढील जनरेशनची सेलुलर टेक्नॉलॉजी फास्ट स्पीड घेऊन येईल ज्याची Mi Mix 3 तयारी दाखवली आहे आणि हा फोन त्यासाठी तयार केला आहे. 

खास बाब म्हणजे Mi Mix 3 आता पर्यंतचा पहिला असा स्मार्टफोन असेल जो मोठ्या 10GB रॅम मेमरी सह येईल. आता पर्यंत आपण 8GB रॅम मेमरी असलेले फोन्स बघितले आहेत, काही दिवसांपूर्वी रिपोर्ट आला होता कि Oppo आपला Find X डिवाइस 10GB रॅम मेमरी सह सादर करेल. Mi Mix 3 स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह सादर केला जाईल. 

Xiaomi Mi Mix 3 च्या या दमदार स्पेक्स व्यतिरिक्त डिवाइस मध्ये जवळपास बेजल-लेस डिस्प्ले देण्यात येईल ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 100 टक्क्यांच्या आसपास असेल. शाओमी Oppo Find X प्रमाणे स्लाइड आउट मॅकेनिज्म चा वापर करू शकते ज्यात कॅमेरा आणि सेंसर्स असतील. Mi Mix 3 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि 3D फेशियल रेकोग्निशन टेक्नॉलॉजी असण्याची पण शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo