शाओमी २० जुलै ते २२ जुलैपर्यंत आपली दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. ह्याचे औचित्य साधून शाओमी Mi 5, रेडमी नोट 3, Mi मॅक्स स्मार्टफोन केवळ १ रुपयात विकणार आहे.
मोबाईल निर्माता कंपनी शाओमी २० जुलै ते २२ जुलैपर्यंत आपली सेकंड अॅनिवर्सरी साजरी करत आहे. हा दिनाचे औचित्य साधून शाओमीने फ्लॅश सेलचे आयोजन करणार आहे. ज्यात आपल्याला शाओमी Mi 5, रेडमी नोट 3 आणि Mi मॅक्स केवळ १ रुपयात मिळत आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
ह्या फ्लॅशसेलमध्ये २० तारखेपासून शाओमी Mi 5 चे १० यूनिट्ससह 20000mAh पॉवरबँकचे १०० यूनिट्स केवळ १ रुपयात मिळणार आहे. तसेच रेडमी नोट 3 चे १० यूनिट्स, 100Mi बँड २१ जुलैपासून १ रुपयात मिळतील. अलीकडेच लाँच झालेल्या शाओमी Mi मॅक्स फॅबलेट आणि MI ब्लूटुथ स्पीकर्स 22 जुलैपासून मिळतील.
ह्या फ्लॅशसेल व्यतिरिक्त अॅनिवर्सरीच्या निमित्ताने शाओमी आपले इतर प्रोडक्ट्सवरही जबरदस्त सूट देत आहे. जसे की, शाओमी MI 5 गोल्ड घेतल्यावर ग्राहकांना त्यावर Mi इन इयर हेडफोन्स प्रो गोल्ड मोफत मिळत आहे. हे ऑफर्स शाओमीच्या Mi.com साइटवर मिळतील.