व्हाट्सॅप नवीन “सस्पिशियस लिंक डिटेक्शन” फीचर वर काम करत आहे

व्हाट्सॅप नवीन “सस्पिशियस लिंक डिटेक्शन” फीचर वर काम करत आहे
HIGHLIGHTS

या फीचर मुळे यूजरला मिळालेला कोणताही मेसेज ज्यात लिंक असेल त्याला अॅप डिटेक्ट करेल आणि बघेल की ही लिंक कोणत्याही फेक वेबसाइट वर रिडायरेक्ट होत आहे का.

Whatsapp is working on new “suspicious link detection” feature: व्हाट्सॅप एंड्राइड प्लॅटफार्म साठी आपल्या लेटेस्ट बीटा वर्जन मध्ये नवीन फीचर वर काम करत आहे. कंपनी ने नवीन बीटा वर्जन मध्ये सस्पिशियस लिंक डिटेक्शन फीचर चा समावेश केला आहे. या फीचर च्या माध्यमातून कंपनी मेसेजिंग प्लॅटफार्म वरून पसरणाऱ्या खोट्या बातम्या आणि स्पॅम लिंक्स थांबवू इच्छित आहे. WABetaInfo च्या रिपोर्ट नुसार व्हाट्सॅप ने हा फीचर 2.18.206 वर्जन वर जारी केला आहे जो एंड्राइड बीटा प्रोग्राम अंतर्गत सादर करण्यात आला होता. रिपोर्ट नुसार कंपनी 2.18.204 वर्जन पासून या फीचर वर काम करत आहे आणि अजूनही हा बीटा यूजर्स साठी पण टेस्ट साठी उपलब्ध झाला नाही. या फीचर मुळे यूजर्स स्पॅम लिंक्स ओळखू शकतील ज्या त्यांना आल्या आहेत किंवा ज्या त्यांनी पाठवल्या आहेत. 

या फीचर मुळे यूजरला मिळालेला कोणताही मेसेज ज्यात लिंक असेल त्याला अॅप डिटेक्ट करेल आणि बघेल की ही लिंक कोणत्याही फेक वेबसाइट वर रिडायरेक्ट होत आहे का. असे झाल्यास लिंक रेड लेबल ने मार्क होईल ज्यावरून समजेल की ही लिंक सस्पिशियस आहे. 

जेव्हा यूजर स्पॅम लिंक ओपन करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा व्हाट्सॅप यूजरला चेतावनी देईल की ते "संभावित संशयास्पद लिंक" ओपन करण्याचा प्रयत्न करत आहेत. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की व्हाट्सॅप सर्वर वर कोणताही डेटा न पाठवता डिवाइस वरच लिंक चे विश्लेषण करण्यात येईल. 

रिपोर्ट मध्ये असा कुठेही उल्लेख नाही की या फीचर च्या माध्यमातून कंपनी खोट्या बातम्या आणि खोट्या लिंक्स सोबत सामना करेल, कदाचीत कंपनी स्पॅम डिटेक्शन मध्ये सुधार आणत आहे. हे प्लॅटफार्म वरून पसरणाऱ्या खोट्या बातम्या थांबण्यासाठी योग्य पाऊल असू शकते. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo