HIGHLIGHTS
यात 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा LED फ्लॅश सह देण्यात आला आहे, सोबतच यात 5 मेगापिक्सल चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण देण्यात आला आहे.
Vivo Y53 ला भारतात लॉन्च होऊन थोडाच वेळ झाला आहे. याला भारतात Rs. 9990 च्या किंमतीत लॉन्च करण्यात आले होते. आता या स्मार्टफोन च्या किंमतीत घट करण्यात आली आहे. आता हा फोन Rs. 8,490 मध्ये उपलब्ध झाला आहे.
Vivo Y53 मध्ये 5-इंचाचा QHD डिस्प्ले आहे, या डिस्प्ले चे रेजोल्यूशन 960 x 540 पिक्सल आहे. सोबत या फोन मध्ये 1.4GHz क्वाड-कोर क्वाल कॉम स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर पण आहे. यात 2GB ची रॅम आणि 16GB ची इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे. या फोन ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256GB पर्यंत वाढवता येते. हा स्मार्टफोन एंड्राइड 6.0 मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित फनटच ऑपरेटिंग सिस्टम 3.0 वर चालतो…
यात 2500mAh ची बॅटरी पण आहे. या फोन मधील कॅमेरा सेटअप वर नजर टाकल्यास यात 8 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा LED फ्लॅश सह देण्यात आला आहे, सोबतच यात 5 मेगापिक्सल चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण देण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त या स्मार्टफोन मध्ये ड्यूल सिम स्लॉट आहे. तसेच 4G LTE, GPS, ब्लूटूथ 4.2, एक माइक्रोUSB 2.0, वायफाय सारखे फीचर्स पण आहेत. याची जाडी 7.64mm आहे आणि याचे वजन 137 ग्राम आहे.
Survey