VIVO Y15 (2019), VIVO Y17 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत

VIVO Y15 (2019), VIVO Y17 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत
HIGHLIGHTS

Vivo Y15 (2019) ची नवीन किंमत आहे 12,990 रुपये

फ्लिपकार्ट, अमेझॉन इंडिया, पेटीएम वरून विकत घ्या फोन

वीवो ने आपल्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमती नुकत्याच कमी केल्या आहेत. या फोन्स मध्ये Vivo Y15 (2019) आणि Vivo Y17 चा समावेश आहे. गॅजेट्स 360 च्या रिपोर्ट्स नुसार दोन्ही फोन्स म्हणजे Vivo Y15 (2019) आणि Vivo Y17 च्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कंपनी ने वीवो वाई15 (2019) भारतात मे 2019 मध्ये लॉन्च केला होता आणि हा फोन ट्रिपल कॅमेऱ्यासह येतो. त्याचबरोबर वीवो वाई17 पण एप्रिल 2019 मध्ये 5,000 एमएएच बॅटरी आणि वाटरड्रॉप नॉच सह लॉन्च केला गेला होता. 

VIVO Y15 (2019) ची नवीन किंमत 

कपातीनंतर आता या फोनची किंमत 12,990 रुपये झाली आहे ज्यात तुम्हाला 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरीएंट मिळतो. यूजर्स हा दोन कलर ऑप्शंस मध्ये विकत घेऊ शकतात ज्यात ऍक्वा ब्लू आणि बर्गंडी रेड चा समावेश आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉन इंडिया, पेटीएम, टाटा क्लिक आणि वीवो इंडिया स्टोर वर नवीन किंमत सह फोन विकत घेता येईल. ऑनलाइन सोबत बातमी अशी पण येत आहे कि हि कपात ऑफलाइन यूजर्स साठी करण्यात आली आहे. 

VIVO Y17 ची नवीन किंमत 

यूजर्स हा वीवो फोन आता 14,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल ज्याची किंमत 15,990 रुपये होती. हि किंमत मे मध्ये झालेल्या एका कपातीनंतर आहे कारण याची लॉन्च किंमत 17,990 रुपये होती. हा फोन पण अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल आणि वीवो ई-स्टोर वरून विकत घेता येईल. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo