Vivo X21 मध्ये असू शकतो अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर

HIGHLIGHTS

यात स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर सह 6GB रॅम पण असू शकतो.

Vivo X21 मध्ये असू शकतो अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर

येणार्‍या काही आठवड्यांत वीवो आपला एक नवीन फ्लॅगशिप डिवाइस सादर करू शकते. तसे पाहता कंपनी ने कही दिवसांपूर्वी Vivo Apex ला पण सादर केले होते. त्याच्याआधी कंपनी ने Vivo X20 UD एडिशन ला पण सादर केले होते, या फोन मध्ये पण अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. 
कंपनी ने Vivo Apex मध्ये पण अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. आता बातमी अशी आली आहे की, Vivo X21 मध्ये पण अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो. याला काही दिवसांपूर्वी 3C कडून सर्टिफिकेशन मिळाले आहे. 
मागे Vivo X21 एका नव्या पोस्टर मध्ये ऑनलाइन दिसला होता. या पोस्टर मधून या फोन च्या मुख्य स्पेक्स बद्दल माहिती मिळाली होती या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप सह डिस्प्ले च्या वर फिंगरप्रिंट सेंसर पण असू शकतो. आशा आहे की या फोन मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. 
या सोबत असे समजले आहे की, यात स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर सह 6GB रॅम पण असू शकतो. तशी या फोन बद्दल अजून काही जास्त माहिती मिळाली नाही.
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo