Vivo ने भारतात आपल्या V11 Pro स्मार्टफोनचा नवीन शानदार सुपरनोवा रेड कलर वेरीएंट लॉन्च केला आहे. V11 Pro Supernova Red Rs 25,990 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि हा डिवाइस इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नोलॉजी, नवीन हलो फुलव्यू डिस्प्ले आणि AI पॉवर्ड डुअल पिक्सल सेंसर सह येतो.
कंपनीचा दावा आहे की Vivo V11 Pro चा हा नवीन कलर वेरीएंट विवो च्या ग्रेटर नॉएडा मधील फॅसिलिटी मध्ये बनवण्यात आला आहे. Vivo V11 Pro सुपरनोवा रेड वेरीएंट विवो ई-स्टोर्स, अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉल वर सेल साठी उपलब्ध झाला आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
V11 Pro Supernova Red लॉन्च ऑफर
लॉन्च ऑफर्स मध्ये Bajaj Finserv सह झिरो डाउन-पेमेंट वर 6 सोप्प्या EMI, झीरो इंटरेस्ट आणि झीरो प्रोसेसिंग फीस तसेच HDFC क्रेडिट किंवा डेबिट कार्ड द्वारा EMI वर डिवाइस विकत घेतल्यास 5% का कॅशबॅक, पेटीएम कॅशबॅक, जियो युजर्ससाठी 4,000 रुपयांपर्यंतचा फायदा आणि 3 TB डेटाचा समावेश आहे. तसेच फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि पेटीएम मॉल वर एक्सचेंज ऑफर्स पण मिळतील.
Vivo V11 Pro की स्पेसिफिकेशंस
Vivo V11 Pro स्मार्टफोन मध्ये एक 6.41-इंचाचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले 19.5:9 आस्पेक्ट रेश्यो सह देण्यात आला आहे. फोन मध्ये एक टीयरड्राप नॉच आहे. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर आहे. सोबतच फोन मध्ये तुम्हाला 6GB च्या रॅम व्यतिरिक्त 64GB ची इंटरनल स्टोरेज पण मिळत आहे. फोन मध्ये एक 4th Generation इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.
फोटोग्राफी साठी Vivo V11 Pro स्मार्टफोन मध्ये एक 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तसेच यात तुम्हाला एक 25-मेगापिक्सलचा AI सेल्फी कॅमेरा पण मिळत आहे. Vivo V11 Pro मध्ये एक 3400mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी ड्यूल इंजन फास्ट चार्जिंग सह येते.