Realme च्या या फोन्सना 2019 च्या सुरवातीला मिळेल एंड्राइड पाई अपडेट

Realme च्या या फोन्सना 2019 च्या सुरवातीला मिळेल एंड्राइड पाई अपडेट
HIGHLIGHTS

रियलमी ने आपल्या ट्वीटर अकाउंटच्या माध्यमातून हि माहिती दिली आहे की पुढच्यावर्षी पहिल्या सहामाहीत कंपनीच्या सर्व फोन्सना एंड्राइड पाई चा अपडेट मिळेल.

रियलमी ने भारतात आतापर्यन्त आपले पाच स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत जे युजर्सना खूप आवडले पण आहेत. हे स्मार्टफोन्स किफायतीशीर किंमतीत चांगले फीचर्स देतात. काही दिवसांपूर्वी रियलमी ने आपल्या ट्वीटर अकाउंटच्या माध्यमातून माहिती दिली आहे की कंपनी आपल्या सर्व फोन्सना 2019 च्या पहिल्या सहामाहीत एंड्राइड 9 पाई वर अपडेट करेल. 
 
ट्वीटर पोस्ट नुसार, रियलमी च्या सर्व फोन्सना 2019 च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत एंड्राइड 9 पाई वर अपडेट केले जाईल. रियलमी ने एक युजरच्या प्रश्नाला “रियलमी फोन्सना लेटेस्ट एंड्राइड व्हर्जन वर अपडेट केले जाईल का?” उत्तर देताना हि माहिती दिली होती. सध्या हे डिवाइसेज एंड्राइड ओरियो वर चालतात.

रियलमी ने डिसेंबरसाठी पण अपडेट शेड्यूलिंगची माहिती दिली आहे आणि आता डिवाइसेजना पाई चा खास अपडेट मिळत नाही, पण काही सुधार या अपडेट्स मध्ये आहेत. रियलमी 2 आणि रियलमी C1 साठी आलेल्या अपडेट मध्ये फिक्सेज, ColorOS 5.2 यांचा समवेश आहे आणि सर्व अन्य डिवाइसेजना सिक्योरिटी पॅच अपडेट आणि कॅमेरा इम्प्रूवमेंटचा समावेश केला गेला आहे.

नुकताच कंपनी ने आपला काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या U1 स्मार्टफोनचा 3GB रॅम वेरिएंट अमेझॉन इंडिया वर ओपन सेल मध्ये सादर केला आहे. हा स्मार्टफोन एम्बिशियस ब्लॅक आणि ब्रेव ब्लू रंगात उपलब्ध आहे. डिवाइस विकत घेतल्यास रिलायंस जियो युजर्सना Rs 2,500 पर्यांतच कॅशबॅक मिळू शकतो जो Rs 50 च्या 50 वाउचर्सच्या स्वरूपात मिळेल. सोबतच युजर्सना क्लियरट्रिपचे ई-कूपन पण मिळेल आणि डिवाइस सर्व मोठ्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारे नो-कॉस्ट EMI वर पण विकत घेता येईल.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo