OPPO RENO 10X ZOOM: दमदार कॅमेरा स्पेक्स आणि स्टाइलिश डिजाईनचा संगम

OPPO RENO 10X ZOOM: दमदार कॅमेरा स्पेक्स आणि स्टाइलिश डिजाईनचा संगम

आपण जर तो काळ आठवला जेव्हा फोन मध्ये कॅमेरा येण्यास सुरवात झाली होती, तर तुमच्या लक्षात येईल कि तेव्हा ते खूपच साधारण होते. जे तुम्हाला मिळायचे तेच तुम्हाला वापरावे लागायचे. पण सध्या स्मार्टफोन्स मधील गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत. तुमच्याकडे सध्या असे स्मार्टफोन्स येऊ लागले आहेत ज्यात अनेक कॅमेरा असतात. हे कॅमेरा फोन्स पारंपरीक कॅमेऱ्यातून घेतलेल्या फोटोला पण टक्कर देऊ शकतात.  

OPPO पण असेच काहीसे आपल्या स्मार्टफोन्स सोबत गेल्या काही वर्षांपासून करत आहे. अर्थात् OPPO च्या फोन्स मध्ये तुम्हाला असेच कॅमेरा मिळतील, ज्याचा उल्लेख आम्ही वर केला आहे. कंपनी कडे अनेक चांगले आणि दमदार सेल्फी कॅमेरा फोन्स आहेत. तसेच या फोन्स मध्ये तुम्हाला चांगले फीचर्स पण मिळत आहेत. जर नवीन OPPO Reno मोबाईल फोन सीरीज बद्दल बोलायचे झाले तर कंपनी या सीरीज बद्दल हि चांगली फोटो घेणारी सिरीज आहे इतकेच म्हणत नाही तर या फोन्सची डिजाईन खूप खास आहे. जर कंपनीच्या लेटेस्ट मोबाईल फोन बद्दल बोलायचे तर हा मोबाईल फोन Reno 10x Zoom आहे, जो कंपनीचा खरोखरच एक खास स्मार्टफोन आहे. तुम्हाला तर माहितीच असेल या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 10x हाइब्रिड झूम मिळत आहे. पण हा एका स्मार्टफोन मध्ये एवढ्या मर्यादित जागेत कसा मावू शकतो? आणि हा फोन फक्त एवढेच फिचर घेऊन येतो का? चला तर मग एक नजर टाकूया OPPO Reno 10x Zoom मोबाईल फोन वर आणि बघ्या याचा कॅमेरा तुम्हाला काय ऑफर करत आहे. 

बॅक पॅनल वर तीन कॅमेरा  

या मोबाईल फोनची सर्वात खास बाब अशी आहे कि Oppo Reno 10x Zoom मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे. यात तुम्हाला एक 48MP चा सेंसर मिळत आहे, जो एका स्टॅन्डर्ड वाइड-एंगल लेंसचे काम करतो. तसेच या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 8MP चा सेंसर मिळत आहे, जी एक अल्ट्रा-वाइड लेंस आहे आणि सोबतच यात तुम्हाला एक 13MP चा सेंसर पण मिळत आहे, जी एक टेलीफोटो लेंस आहे. हे तिन्ही कॅमेरा एकत्र आल्याने तुम्हाला एक आकर्षक फोटो मिळतो. हे तिन्ही कॅमेरा मिळून तुम्हाला हाइब्रिड झूम फंक्शन देतात.  

क्लोज़र टू द एक्शन

फक्त सिंगल टेलीफोटो लेंस वर जास्त अवलंबून न राहता OPPO Reno 10x Zoom स्मार्टफोन तिन्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने तुम्हाला एक जबरदस्त फोकल रेंज देतो, जी 16mm आणि 160mm मधील आहे. हि एक इफेक्टिव फोकल लेंथ म्हणता येईल, जी जवळपास एका अल्ट्रा-वाइड एंगल लेंसच्या 10 पट आहे. तसेच या मोबाईल फोनचा कॅमेरा जास्त खास करण्यासाठी आपण जगातील पहिल्या पेरिस्कोप लेंसला पण याचे श्रेय द्यावे लागेल, तसेच या श्रेणीत D-Cut लेंस पण येते. विशेष म्हणजे फोन खूप स्लिम आणि स्लीक आहे. तसेच OPPO Reno 10x Zoom स्मार्टफोन मध्ये तुम्हाला ड्यूल ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन पण मिळत आहे, जो झूमच्या वेळी वस्तू स्टेबल ठेवण्यास मदत करतो.  

कॅप्चर मोर

हि फक्त झूम लेंस इत्यादींची गोष्ट नाही. जो 8MP चा सेंसर आहे, त्यासोबत तुम्हाला 120-डिग्री अल्ट्रा-वाइड क्षमता मिळत आहे, जो खूप सहज फोटो चांगले करतो. या लेंसचा वापर तेव्हा करता येईल जेव्हा तुम्हाला मोठ्या फ्रेमची गरज असते. यात तुम्ही लँडस्केप फोटो व्यतिरिक्त जास्त लोकांनाच चांगलासा ग्रुप फोटो पण घेऊ शकता. 

नाइट टाइम शॉट

कमी प्रकाशात अनेक स्मार्टफोन्सचे कॅमेरा योग्यरीत्या फोटो घेत नाहीत. पण OPPO Reno 10x Zoom मोबाईल फोन बद्दल OPPO म्हणते कि तुम्ही चांगले फोटो कमी प्रकाशात पण कॅप्चर करू शकता. याचा अर्थ असा आहे कि कंपनी म्हणते कि तुम्ही याच्या माध्यमातून कमी प्रकाशात पण चांगले फोटो घेऊ शकाल. याच्या 48MP कॅमेरा सेंसर बद्दल बोलायचे तर हा एक Sony IMX586 सेंसर आहे, जी 1/2.0-इंच लार्ज आणि f/1.7 अपर्चर वाली लेंस आहे. जी तुम्हाला कमी प्रकाशात पण ब्राइट इमेज क्लिक करण्यास मदत करते. त्यानंतर एक्सपोजर संतुलित करण्यासाठी आणि फोटो मधील कोणतीही नॉइज कमी करण्यासाठी मल्टी फ्रेम नॉइज रिडक्शन (MNFR) आणि HDR सॉफ्टवेयर एल्गोरिदम सोबत जोडले जाते.  

सॉफ्टवेयर मॅजिक

OPPO Reno 10x Zoom फक्त हार्डवेयर पुरता मर्यादित नाही. यात तुम्हाला काही दमदार सॉफ्टवेयर पण मिळत आहेत. फोन फक्त यूजर्सना पोर्टेट शॉट्स घेण्यास मदत करत नाही, उलट तुम्हाला यात पाच वेगवेगळे बोकेह मोड मिळतात. ज्यातील एक तुम्हाला निवडायचा आहे. इतकेच नव्हे तर यूजर्सना AI ब्यूटीफिकेशन मोड पण मिळत आहे, हा तोच आहे जो कंपनीने अलीकडेच आलेल्या आपल्या स्मार्टफोन लाइनअप मध्ये दिला आहे. तसेच फोन मध्ये तुम्हाला एक Dazzle कलर मोड पण मिळत आहे, जो कंपनीनुसार चांगल्या फोटो साठी पिक्सल-लेवल कलर रेस्टोरेशन वर नजर ठेवतो.  

स्लीक आणि स्टाइलिश

OPPO बद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे सेल्फी कॅमेरा साठी चांगला एक्सपीरियंस आहे, जो तुम्हाला OPPO Reno 10x Zoom मध्ये पण मिळेल. फोन मध्ये तुम्हाला एक 16MP चा सेल्फी कॅमेरा पण मिळतो. या फोन मध्ये एक नवीन मॅकेनिज्म वापरण्यात आला आहे, ज्याला ‘शार्क फिन’ नाव देण्यात आले आहे. या सिस्टम मुळे तुम्हाला हायर स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो (93.1%) मिनिमल बेजल्स सह मिळतो. याचा राइजिंग कॅमेरा जवळपास एका सेकंदापेक्षा कमी वेळात फोटो घेण्यास तयार होतो. जर तुमच्याकडून चुकून फोन सुटला तरी घाबरण्याचे कारण नाही कारण हा आपोआप बॉडीच्या आत जातो. ज्यामुळे कॅमेरा डॅमेज होत नाही.  

फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्स

OPPO ला माहिती आहे कि जर एखाद्या फोनच्या परफॉरमेंस मध्ये काही कमी झाले तर त्यामुळे यूजर्स एक्सपीरियंस खराब होतो. याचा कारणामुळे कंपनीने क्वालकॉमचा लेटेस्ट चिपसेट आपल्या फोन मध्ये दिला आहे. या मोबाईल फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट आहे. तसेच फोन 8GB रॅम सह घेता येतोआणि स्टोरेज पाहता या फोन मध्ये 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज तुम्हाला मिळत आहे. हि तुमच्या फोन मध्ये अनेक ऍप्स, विडियो आणि फोटो इत्यादीसाठी पुरेशी आहे.  

तुम्ही पाहू शकता कि, OPPO Reno 10x Zoom मोबाईल फोन मध्ये तुम्हाला जबरदस्त स्पेसिफिकेशन मिळत आहेत, जे कोणत्याही स्मार्टफोन प्रेमीला आकर्षित करण्यासाठी पुरे आहेत, सोबतच यातील कॅमेरा फीचर्स याला अजून खास बनवतात. तसेच याच्या स्पेक्स मुळे यूजर्सना आपण या फोन वर अनेक कामे करू शकतो याचाही खात्री मिळते.  

[स्पॉन्सर्ड पोस्ट] 

Sponsored

Sponsored

This is a sponsored post, written by Digit's custom content team. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo