6000MAH च्या दमदार बॅटरी सह आला TECNO SPARK POWER

6000MAH च्या दमदार बॅटरी सह आला TECNO SPARK POWER
HIGHLIGHTS

दोन रंगात आहे उपलब्ध

Tecno Mobile ने भारतात आज आपल्या Spark series मध्ये एक नवीन स्मार्टफोन Tecno Spark Power लाँन्च केला आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत Rs 8499 ठेवण्यात आली आहे आणि याचा सेल 1 डिसेंबर पासून Flipkart वर सुरु होईल. Tecno Spark Power दोन रंगात Dawn Blue आणि Alphenglow Gold आला आहे.

Tecno Spark Power मध्ये 6.35 इंचाचा HD+ 2.5D कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 720×1548 पिक्सल आहे. डिवाइस हीलियो P22 ओक्टा-कोर प्रोसेसर (MT6762) द्वारा संचालित आहे आणि याला 650MHz IMG PowerVR GE8320 GPU ची सोबत मिळाली आहे.

Tecno Spark Power मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे आणि याची स्टोरेज microSD च्या माध्यमातून 256GB पर्यंत वाढवता येईल. फोनच्या मागे एक फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे, सिक्योरिटी साठी फोन मध्ये फेस अनलॉक सपोर्ट पण देण्यात आला आहे.

Spark Power मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एक 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे ज्याचा अपर्चर f/2.0 आहे, तर दुसरी 8 मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस आहे आणि तिसरी 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. कॅमेरा सेटअप सोबत क्वाड LED फ्लॅश देण्यात आला आहे आणि फोनच्या फ्रंटला 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

स्मार्टफोन एंड्राइड 9 पाई वर आधारित कंपनीच्या कस्टम UI HiOS 5.5 वर चालतो आणि फोन मध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर डिवाइस मध्ये डुअल सिम, डुअल 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, GPS, डुअल-सिम आणि माइक्रो USB पोर्ट देण्यात आला आहे. डिवाइसचे मेजरमेंट 158.5 x 75.98 x 9.17 mm आहे आणि याचे वजन 198.2 ग्राम आहे. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo