फक्त Rs. 3,999 मध्ये भारतात लॉन्च झाला डुअल रियर कॅमेरा वाला स्मार्टफोन

HIGHLIGHTS

एक कॅमेरा 8MP चा आणि दूसरा 2MP चा आहे. फोन मध्ये समोरच्या बाजूस सेल्फी घेण्यासाठी 5MP चा कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेरा सह LED फ्लॅश आहे.

फक्त Rs. 3,999 मध्ये भारतात लॉन्च झाला डुअल रियर कॅमेरा वाला स्मार्टफोन

Swipe Elite Dual मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि याला फक्त Rs. 3,999 च्या किंमतीत भारतात लॉन्च केला गेला आहे. हा एक एंट्री लेवल स्मार्टफोन आहे. हा ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट शॉपक्लूज वरून विकत घेतला जाऊ शकतो. हा ब्लॅक, गोल्ड आणि स्लिवर रंगात उपलब्ध आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

यासोबतच या फोन सह रिलायंस जियो ची 'जियो फुटबॉल ऑफर' पण मिळत आहे, ज्याच्या अंतर्गत यूजरला Rs. 2200 चे फायदे मिळतात.

या फोनच्या स्पेक्स वर नजर टाकल्यास यात 5-इंचाचा डिस्प्ले आहे. यात 1.3GHzक्वाड-कोर मीडियाटेक प्रोसेसर पण दिला गेला आहे. हा 1GB रॅम आणि 64GB च्या इंटरनल स्टोरेज सह येतो. स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. हा एंड्राइड नूगा ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो.

या फोन मधील कॅमेरा पाहता यात डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. एक कॅमेरा 8MP चा आणि दूसरा 2MP चा आहे. फोन मध्ये समोरच्या बाजूस सेल्फी घेण्यासाठी 5MP चा कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेरा सह LED फ्लॅश आहे. 

यात 4G VoLTE चा सपोर्ट पण आहे. यात 3000mAh ची बॅटरी आहे. यात एक माइक्रो-USB आणि 3.5mm ऑडियो जॅक पण देण्यात आला आहे. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo