Samsung Galaxy S9 Plus विरुद्ध iPhone XS Max मध्ये स्पेक्सची तुलना; तुमच्या मते कोणता डिवाइस आहे चांगला?

Samsung Galaxy S9 Plus विरुद्ध iPhone XS Max मध्ये स्पेक्सची तुलना; तुमच्या मते कोणता डिवाइस आहे चांगला?
HIGHLIGHTS

आज आम्ही Samsung Galaxy S9 Plus आणि iPhone XS Max मोबाईल फोन्समध्ये स्पेक्सची तुलना करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की हे स्मार्टफोन्स एकमेकांपेक्षा किती वेगळे आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी S9 Plus मोबाईल फोन यावर्षीच्या सुरवातीला लॉन्च केला गेला होता, या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला सॅमसंगचा स्वतःचा लेटेस्ट एक्सीनोस 9810 प्रोसेसर मिळेल. तसेच यात तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप मिळेल. जर iPhone XS Max मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर हा आता पर्यंतचा ऍप्पलचा सर्वात महाग फोन आहे. हा डिवाइस iPhone X सारख्याच डिजाईन सह लॉन्च केला गेला आहे, तसेच यात तुम्हाला ऍप्पलच्या इतर डिवाइसच्या तुलनेत थोडा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. आज आम्ही या दोन्ही फोन्स मध्ये स्पेक्सची तुलना करणार आहोत आणि बघणार आहोत की कशाप्रकारे हे मोबाईल फोन एकमेकांपेक्षा वेगळे आहेत, आणि कशाप्रकारे यातील एक दुसऱ्यापेक्षा चांगला आहे. 

Samsung Galaxy S9 Plus आणि iPhone XS Max डिस्प्ले
डिस्प्ले पासून सुरु केल्यास सॅमसंग गॅलेक्सी S9 Plus मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 6.2-इंचाचा क्वाड HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, याचे रेजोल्यूशन 1440×2960 पिक्सल आहे. जर iPhone XS Max मोबाईल फोन बद्दल बोलायचे तर यात एक मोठा म्हणजे 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1242×2688 पिक्सल रेजोल्यूशन सह येतो. 
 
Samsung Galaxy S9 Plus आणि iPhone XS Max परफॉरमेंस
जेव्हा गोष्ट परफॉरमेंसची येते तेव्हा या दोन फोन्समधील फरक दिसून येतो आणि समजते की या दोन्ही फोन्स मध्ये हाच सर्वात मोठा फरक असू शकतो. iPhone XS Max मोबाईल फोन मध्ये ऍप्पलचा लेटेस्ट Apple A12 Bionic चिपसेट देण्यात आला आहे, त्याचबरोबर हा मोबाईल फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सोबत इतर काही स्टोरेज वेरिएंट्स मध्ये उपलब्ध करवण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी S9 Plus मोबाईल फोनची चर्चा करायची झाल्यास हा मोबाईल फोन Exynos 9810 ओक्टा-कोर प्रोसेसर सह लॉन्च केला गेला आहे, तसेच हा मोबाईल फोन तुम्ही भारतात तीन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मध्ये घेऊ शकता. 
 
Samsung Galaxy S9 Plus आणि iPhone XS Max कॅमेरा 
कॅमेरा सेगमेंट पाहता दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये तुम्हाला 12MP चा सेंसर फोनच्या बॅक वर देण्यात आला आहे, त्याचबरोबर सॅमसंग गॅलेक्सी S9 Plus च्या फ्रंटला तुम्हाला एक 8MP चा कॅमेरा यूनिट मिळत आहे, तर iPhone XS Max मोबाईल फोन 7MP च्या सेंसर सह लॉन्च केला गेला आहे. 

Samsung Galaxy S9 Plus आणि iPhone XS Max किंमत   

सर्वात शेवटी बोला किंमतीविषयी सैमसंग गैलेक्सी S9 Plus मोबाईल फोनच्या बेस वेरिएंटची भारतात किंमत Rs 52,990 फ्लिप्कार्ट वर आहे,तर तुम्ही iPhone XS Max मोबाईल फोन घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हा अमेझॉन वरून Rs 1,07,899 मध्ये घेऊ शकता.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo