Nokia 8.1 विरुद्ध Nokia 7.1 चला जाणून घेऊया यांच्यातील फरक

Nokia 8.1 विरुद्ध Nokia 7.1 चला जाणून घेऊया यांच्यातील फरक
HIGHLIGHTS

Nokia ने आपला Nokia 8.1 मोबाईल फोन भारतात लॉन्च केला आहे, हा HMD ग्लोबलच्या स्मार्टफोन लाइनअप मधील नवीन मोबाईल फोन आहे. आज आम्ही या डिवाइसची नोकियाच्याच दुसऱ्या मोबाईल फोन म्हणजे Nokia 7.1 सोबत तुलना करणार आहोत, आणि कोणत्या डिवाइस मध्ये जास्त दम आहे हे जाणून घेणार आहोत.

तुम्हाला तर माहिती आहे की काही दिवसांपूर्वी दुबई मध्ये झालेल्या एका इवेंट मध्ये चीन मध्ये ऑक्टोबर मध्ये लॉन्च केल्या गेलेल्या Nokia X7 मोबाईल फोनचा ग्लोबल वेरीएंट Nokia 8.1 म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. तसेच याच लॉन्च इवेंट मध्ये असे सांगण्यात आले होते की हा मोबाईल फोन लवकरच भारतीय बाजारात पण लॉन्च केला जाईल. जसे सांगण्यात आले होते तसेच झाले आहे. Nokia 8.1 मोबाईल फोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. 

Products

Nokia 8.1

Nokia 7.1

Launch price

Rs 19,999

Display

6.18-inch

5.84-inch

Resolution

1080 x 2244 pixels

1080 x 2280 pixels

Processor make

Qualcomm Snapdragon 710

Qualcomm Snapdragon 636

Processor

2.2GHz octa-core

1.80GHz octa-core

RAM

4GB

4GB

Internal storage

64GB

64GB

Expandable storage

400GB

400GB

Rear camera

12MP + 13MP

12MP + 5MP

Rear Flash

Yes

Yes

Front camera

20MP

8MP

LED selfie light

No

No

Android version

9.0 Pie

8.1 Oreo

Sim slot

Dual

Dual

या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला ड्यूल रियर कॅमेऱ्याव्यतिरिक्त HDR10 चा सपोर्ट पण मिळत आहे. तसेच हा मोबाईल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 प्लॅटफार्म वर लॉन्च केला गेला आहे. तसेच जर Nokia 7.1 मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर हा भारतात Rs 19,999 मध्ये लॉन्च केला गेला आहे. यात पण तुम्हाला एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे. चला तर मग एक नजर या मोबाईल फोन्सच्या स्पेक्स वर टाकूया आणि बघूया की स्पेसिफिकेशनच्या बाबतीती हे मोबाईल फोन एकमेकांपेक्षा किती वेगळे आहेत. 
 
दोन्ही मोबाईल फोन्सच्या डिस्प्ले पासून चर्चा सुरु करणे योग्य ठरेल. Nokia 8.1 मोबाईल फोन एका मोठ्या 6.18-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2244 पिक्सल रेजोल्यूशन सह येतो. त्याचबरोबर जर Nokia 7.1 मोबाईल फोन बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला एक छोटा डिस्प्ले म्हणजे एक 5.84-इंचाची स्क्रीन मिळत आहे. याचे रेजोल्यूशन 1080×2280 आहे. 
 
जर परफॉरमेंस विषयी चर्चा करायची झाल्यास Nokia 8.1 मोबाईल फोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 ओक्टा-कोर प्रोसेसर मिळत आहे, तर Nokia 7.1 मोबाईल फोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 प्रोसेसर मिळत आहे. 
 
कॅमेरा पाहता या नोकिया 8.1 मोबाईल फोन मध्ये एक ड्यूल 12MP+13MP चा सेटअप मिळत आहे. तसेच Nokia 7.1 मोबाईल फोन मध्ये पण तुम्हाला एक ड्यूल 12MP+5MP चा रियर कॅमेरा सेटअप मिळत आहे. तसेच दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये 8MP चा फ्रंट सेंसर आहे. 
 
किंमतीबद्दल चर्चा करायची झाल्यास Nokia 8.1 मोबाईल फोन भारतात Rs 26,999 मध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच हा मोबाईल फोन 25 डिसेंबर पासून सेल साठी येणार आहे. हा तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही माध्यमांतून विकत घेऊ शकता. तर Nokia 7.1 मोबाईल फोन भारतात Rs 19,999 मध्ये लॉन्च केला गेला आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo