नवीन VIVO V17 झाला लॉन्च, जुन्या VIVO V17 PRO पेक्षा आहे किती वेगळा?

नवीन VIVO V17 झाला लॉन्च, जुन्या VIVO V17 PRO पेक्षा आहे किती वेगळा?
HIGHLIGHTS

Vivo V17 भारतात झाला लॉन्च

Vivo V17 भारतात लॉन्च झाला आहे आणि हा नवीन smartphone पंच-होल डिजाईन आणि ग्रेडिएंट फिनिश सह आला आहे. V17 च्या मागे रेक्टंगुलर शेप मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Vivo V17 ला टक्कर देण्यासाठी स्मार्टफोन बाजरात आधीपासून Realme XT आणि Redmi K20 सारखे स्मार्टफोन्स आहेत. पण त्याआधी आपण जाणून घेतले पाहिजे कि नवीन Vivo V17 आधीच्या VIVO V17 PRO पेक्षा किती वेगळा आहे. या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये प्राइस, स्पेक्स आणि फीचर्सच्या बाबतीत फरक जाणून घेण्यासाठी आम्ही हि स्पेक्सची तुलना केली आहे.

VIVO V17 VS VIVO V17 PRO PRICE

Vivo V17 भारतात 22,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे आणि याचा पहिला सेल 17 डिसेंबर पासून सुरु होईल . विवोचा हा नवीन मोबाईल फोन Flipkart आणि Amazon वर सेल केला जाईल. ऑनलाइन प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त डिवाइस ऑफलाइन पण सेल केला जाईल. VIVO V17 PRO च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची Price Rs 29,990 ठेवण्यात आली आहे आणि डिवाइस मिडनाईट ओशन आणि ग्लेशियर आइस ऑप्शन्स सह आला आहे.

VIVO V17 VS VIVO V17 PRO DISPLAY

Vivo V17 मध्ये 6.44 इंचाचा फुल HD प्लस सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे आणि VIVO V17 PRO स्मार्टफोन मध्ये 6.44 इंचाचा फुल HD+ (1080 x 2400 पिक्सल) अल्ट्रा फुलव्यू सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे आणि याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 91.65 आहे. डिवाइसच्या रियर पॅनल वर Corning Glass 6 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

VIVO V17 VS VIVO V17 PRO CAMERA

Vivo V17 च्या कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर डिवाइस क्वाड रियर कॅमेरा सह आला आहे आणि यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्स्लचा सेकंडरी कॅमेरा तसेच दोन 2 मेगापिक्सलचे सेंसर देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रियर कॅमेऱ्यामध्ये अल्ट्रा स्टेबल विडियोचा ऑप्शन पण मिळत आहे आणि त्याचबरोबर डिवाइस AI HDR आणि Pro मोड ने सुसज्ज आहे. नाइट्स शॉट्स चांगले यावेत म्हणून फोन मध्ये सुपर नाईट मोडचा समावेश केला गेला आहे. VIVO V17 PRO फोनच्या मागे क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे आणि हा Sony IMX582 सेंसर आहे आणि याचा अपर्चर f/1.8 आहे. दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आहे आणि याचा अपर्चर f/2.5 आहे जो 2x ऑप्टिकल झूम आणि 10x हाइब्रिड झूम सपोर्ट सह आला आहे. तसेच यात 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे जिचा अपर्चर f/2.2 आहे आणि हा 2 मेगापिक्सल बोकेह कॅमेरा सह आला आहे. फोनच्या फ्रंटला 32+8 मेगापिक्सलचा डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. VIVO V17 PRO फोटोग्राफी साठी सुपर नाईट सेल्फी फीचर सह आला आहे.  

VIVO V17 VS VIVO V17 PRO PERFORMANCE

Vivo V17 एंड्राइड 9 पाई वर आधारित Funtouch OS 9.2 वर चालतो आणि फोन स्नॅपड्रॅगॉन 675 AIE प्रोसेसर सह येतो. डिवाइस मध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रो SD कार्डने वाढवता येते. VIVO V17 PRO क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 SoC द्वारा संचालित आहे आणि हा 8GB रॅम तसेच 128GB स्टोरेज सह पेयर केला गेला आहे.

VIVO V17 VS VIVO V17 PRO BATTERY

Vivo V17 मध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच कनेक्टिविटी साठी फोन मध्ये USB Type C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक , ब्लूटूथ 5.0 GPS, OTG, WiFi देण्यात आला आहे. VIVO V17 PRO फोन मध्ये 4,100mAh ची बॅटरी मिळत आहे आणि इसे 18W डुअल-इंजन फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह आला आहे. Connectivity साठी डिवाइस मध्ये 4G LTE, ब्लूटूथ 5.0, डुअल-बॅंड Wi-Fi, GPS, GLONASS, आणि Beidu चे पर्याय देण्यात आले आहेत. VIVO V17 PRO चे मेजरमेंट 159 x 74.70 x 9.8 mm आहे आणि याचे वजन 201.8 ग्राम आहे. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo