Sony Xperia XA1, XA1 Ultra आणि Sony Xperia XA1 Plus स्मार्टफोंस ला मिळाला एंड्राइड 8 Oreo अपडेट

Sony Xperia XA1, XA1 Ultra आणि Sony Xperia XA1 Plus स्मार्टफोंस ला मिळाला एंड्राइड 8 Oreo अपडेट
HIGHLIGHTS

Sony च्या या स्मार्टफोंस ला मिळालेल्या या Oreo अपडेट ची साइज 900MB आहे आणि याबरोबरच स्मार्टफोंस ला फेब्रुवारी 2018 चा सिक्यूरिटी पॅच पण मिळाला आहे.

Sony ने त्यांच्या Sony Xperia XA1, XA1 Ultra आणि XA1 Plus स्मार्टफोंस ला एंड्राइड 8 Oreo अपडेट जारी केला आहे. 900MB साइज असणार्‍या या नवीन एंड्राइड अपडेट सोबतच कंपनी ने या स्मार्टफोंस मध्ये फेब्रुवारी 2018 चा सिक्यूरिटी पॅच पण देण्यात आला आहे. 
याची माहिती कंपनी ने आपल्या ब्लॉग मधून दिली आहे, या ब्लॉग मध्ये सांगण्यात आले आहे की, “सोनी च्या Xperia XA1 सीरीज च्या स्मार्टफोंस यूजर्स साठी खुश खबर आहे, कारण त्यांना एंड्राइड Oreo अपडेट देण्यात आला आहे. कंपनी ने दिलेल्या हा एंड्राइड अपडेट बिल्ड नंबर 48.0.A.1.131 (Android 7.0) to version 48.1.A.0.116 (Android 8.0.0) या नावाने दिला गेला आहे.” 
महत्वाचे म्हणजे, “या एंड्राइड अपडेट मध्ये जवळपास 5 सिक्यूरिटी पॅच चा समावेश आहे. तसेच कंपनी ने सांगितले आहे की ती लवकरच यात FTF फर्मवेयर फाइल्स चा पण समावेश करणार आहे.”
हा अपडेट आल्यानंतर या स्मार्टफोंस ला काही नवीन फीचर मिळाले आहेत, जसे की जर तुम्ही शॉर्टकट एक्सेस करण्यासाठी कोणत्याही आयकॉन वर लॉन्ग प्रेस करू शकता, ही सुविधा पण आता तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे. तसेच होम स्क्रीन वर आता तुम्ही पिंस पण अॅड करू शकता. याव्यतिरिक्त अजून पण खुप फीचर तुम्हाला या अपडेट नंतर या स्मार्टफोंस मध्ये दिसतील. 
गूगल ने एंड्राइड P चा प्रीव्यू सादर केला आहे, जर तुम्ही तो बघू वा वापरू इच्छित असाल तर तुम्ही इथे जाऊन तसे करू शकता. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo