Sony Xperia XZ2 साठी जाहीर झाला एंड्राइड P बीटा 2 अपडेट

Sony Xperia XZ2 साठी जाहीर झाला एंड्राइड P बीटा 2 अपडेट
HIGHLIGHTS

Sony Xperia XZ2 अशा निवडक स्मार्टफोन्स पैकी आहे ज्यांना एंड्राइड P बीटा अपडेट मिळाला आहे, या फोंस मध्ये Nokia 7 Plus आणि Essential PH-1 इत्यादी स्मार्टफोन्स पण आहेत.

गूगल च्या पिक्सल डिवाइस आणि Essential के PH-1 स्मार्टफोन साठी एंड्राइड P बीटा 2 जाहीर झाल्यानंतर आता Sony ने पण Xperia XZ2 स्मार्टफोन साठी एंड्राइड P बीटा 2 जाहीर केला आहे. जर तुम्ही SonyXperia XZ2 च्या बीटा 2 वर असाल तर तुम्हाला बीटा 2 साठी OTA अपडेट नोटिफिकेशन मिळेल, जो एंड्राइड P डेवलपर प्रीव्यू 3 नावाने ओळखला जातो. Sony Xperia XZ2 अशा निवडक स्मार्टफोन्स पैकी आहे ज्यांना एंड्राइड P बीटा अपडेट मिळाला आहे, या फोंस मध्ये Nokia 7 Plus आणि Essential PH-1 इत्यादी स्मार्टफोन्स पण आहेत.

गूगल ने पहिल्यांदाच थर्ड-पार्टी फोन्स साठी एंड्राइड P बीटा जाहीर केला आहे, जे वेगवेगळ्या सात निर्मात्यांचे फोन्स आहेत Sony Xperia XZ2 च्या H8216, H8266 आणि H8296 ला एंड्राइड P बीटा 2 अपडेट मिळेल, जर यूजर्स आधी पासून बीटा 1 वर असाल तर बीटा 2 अपडेट पण मिळेल. ही माहिती मिळाली नाही की सोनी बीटा 2 ची फॅक्टरी इमेज रिलीज करेल की नाही, पण बीटा 1 यूजर्सना OTA अपडेट मिळेल. 

गूगल ने आधीच गूगल पिक्सल डिवाइस साठी एंड्राइड P बीटा 2 अपडेट जारी केला आहे, ज्यात Google Pixel, Pixel XL, Pixel 2 आणि Pixel 2 XL सामील आहेत. Essential ने पण PH-1 स्मार्टफोन साठी बीटा 2 अपडेट जारी केला आहे. Sony Xperia XZ2 च्या अपडेट चा लेटेस्ट बिल्ड नंबर PDP-PKQ1.180513.001-10128 आहे. 

बदलां बद्दल बोलायचे झाले तर Sony चे म्हणेन आहे की कंपनी ने आधीच्या बीटा अपडेट मधील बग्स हटवले आहेत, ज्यामुळे काही अॅप्स क्रॅश झाले होते. Sony ने इतर काही बग्स पण फिक्स केले आहेत ज्यात माइक्रोफोन्स चे थांबणे, वायरलेस चार्जिंग समस्या, SD-कार्ड फोर्मेटिंग इशू आणि इतर 4G संबधित समस्या आहेत. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo