MWC 2018: सोनी ने लॉन्च केले Xperia XZ2 आणि XZ2 Compact स्मार्टफोंस

MWC 2018: सोनी ने लॉन्च केले Xperia XZ2 आणि XZ2 Compact स्मार्टफोंस
HIGHLIGHTS

नवीन Xperia XZ2 आणि Xperia XZ2 Compact स्मार्टफोंस मध्ये सोनी च्या नव्या ‘एम्बिएंट फ्लो’ डिजाइन चा समावेश केला गेला आहे आणि हे डिवाइस 18:9 एस्पेक्ट रेश्यो च्या डिस्प्ले सह येतात.

सोनी ने शेवटी हाय-एंड फोन यूजर्सना पुन्हा एक्सपीरिया डिवाइस कडे आणण्याच्या मार्ग शोधला आहे. सुधारित आणि अधिक चांगल्या डिजाइन सह आलेले Xperia XZ2 आणि Xperia XZ2 Compact कंपनी चे नवीन हाय-एंड फोंस आहेत. दोन्ही फोंस मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आणि 4GB रॅम आहे. 

या फोंस ला सोनी च्या जुन्या डिजाइन पेक्षा वेगळे बनवण्यात आले आहे हे काही प्रमाणात मागच्या वर्षीच्या HTC च्या फोंस सारखे वाटतात. दोन्ही डिवाइस मध्ये कर्व्ड आणि शाइनी ग्लास बॅक आहे आणि हे फोंस वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करतात. डिवाइस च्या फ्रंट आणि बॅक वर अॅल्युमीनियम फ्रेम सह गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. दोन्ही फोंस IP68 रेटेड वॉटरप्रुफ आहेत आणि यात रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे. सोनी या नव्या डिजाइनला एम्बिएंट फ्लो म्हणत आहे. 
पण डिजाइन मधील बदला सोबतच 3.5mm चा हेडफोन जॅक पण हटवण्यात आला आहे. तरीही Xperia XZ2 फोंस मध्ये फ्रंट-फेसिंग स्टीरियो स्पीकर्स आहेत जे सोनी च्या डायनामिक वाइब्रेशन सिस्टम सह उपलब्ध आहेत. जे ऑडियो डाटा ला अॅनालाइज करतात आणि सिग्नल्स ला वाइब्रेशन मध्ये बदलतात याचा उद्देश ऐकण्याचा अनुभव वृद्धिंगत करणे हा आहे. 

नवीन Xperia XZ2 आणि Xperia XZ2 Compact मध्ये नवीन 18:9 एस्पेक्ट रेश्यो चा डिस्प्ले आहे. Xperia XZ2 आणि XZ2 Compact मध्ये क्रमश: 5.8 इंच आणि 5 इंचाचा डिस्प्ले आहे जो फुल HD रेजोल्यूशन सह येतो आणि HDR कंटेंट ला सपोर्ट करतो. सध्या 5 इंचाचा डिस्प्ले असलेला Xperia XZ2 Compact सर्वात पॉवरफुल कॉम्पॅक्ट फोन आहे. सोनी चा दावा आहे की हा X-रियलिटी प्रोसेसर चा वापर करून कंटेंट ला HDR वर अपस्केल पण करू शकतो. 
या नव्या फोंस मध्ये डुअल कॅमेरा सेटअप नाही आहे, पण सोनी ने इवेंट मध्ये डुअल कॅमेरा फोन चा टीजर दाखवला होता आणि या फोन मध्ये ISO 51000 वर शूट करण्याची क्षमता असेल, जी फक्त अंतर-परिवर्तनीय कॅमेरा मध्ये शक्य आहे. 

या दोन्ही फोंस मध्ये 19 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा सेटअप आहे जो 4K HDR मध्ये वीडियो कॅप्चर करू शकतो. मागच्या वर्षी चा 960FPS वर सुपर स्लो-मो विडियो या वर्षी पण आहेत आणि यावेळेस सोनी ने रेजोल्यूशन ला 1080p पर्यंत वाढवले आहे. तसे पाहता नवीन लॉन्च झालेला Samsung Galaxy S9 फक्त 720p वर सुपर स्लो-मो वीडियो शूट करू शकतो. फ्रंटला 5 मेगापिक्सल चा कॅमेरा आहे. मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी पण 3D क्रिएटर आहे ज्यामुळे यूजर 3D सेल्फी घेऊ शकतील. 
Xperia XZ2 मध्ये 3,180mAh ची बॅटरी आहे तर Xperia XZ2 Compact मध्ये 2,870mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Xperia XZ2 64GB स्टोरेज पण देतो आणि याची स्टोरेज माइक्रो SD कार्ड ने वाढवता येईल. 

अजून पर्यंत या डिवाइस च्या किंमतीच्या बाबतीत काही माहिती मिळाली नाही, पण सोनी चे म्हणने आहे की या फोंस ची शिपिंग पुढच्या महिन्यापासून सुरू होईल. आशा आहे की हे लवकरच भारतात येतील.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo