अपेक्षेपेक्षा जास्त महाग असू शकतो सॅमसंग गॅलेक्सी X फोल्डेबल स्मार्टफोन

अपेक्षेपेक्षा जास्त महाग असू शकतो सॅमसंग गॅलेक्सी X फोल्डेबल स्मार्टफोन
HIGHLIGHTS

असे बोलले जात आहे की सॅमसंग गॅलेक्सी X फोल्डेबल डिवाइस 2,000 डॉलर च्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की आगमी काळात फोंस ची किंमत गगनाला भिडणार आहे.

कोरिया च्या एका विश्लेषक वर विश्वास ठेवल्यास 2019 मध्ये लॉन्च केल्या जाणारा सॅमसंग गॅलेक्सी X Foldable डिवाइस 2,000 डॉलर च्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. याची माहिती कोरिया टाइम्स च्या एका रिपोर्ट मधून समोर आली आहे, ज्यात सांगण्यात आले आहे की Shinhan Financial आणि Golden Bridge Investment चे असे म्हणेन आहे, डिवाइस साठी 2019 मध्ये हा प्रोडक्ट लॉन्च केला जाणार आहे आणि यासाठी लागणार्‍या पार्ट्स ची किंमत जवळपास 2 मिलियन Won म्हणजे जवळपास 1,850 डॉलर म्हणजे Rs 124,000 च्या आसपास असेल. 

याचा अर्थ असा की हा खरोखरच एक महाग फोन असणार आहे, असे पण बोलू शकतो की सॅमसंग चा आता पर्यंतचा सर्वात महाग डिवाइस बनेल. अॅप्पल ने 1,000 डॉलर च्या किंमतीत iPhone X लॉन्च करण्यात आला होता. ही किंमत पाहता ही अॅप्पल च्या iPhone X च्या तुलनेत दुप्पट आहे. 

या डिवाइस बद्दल खुप माहिती समोर आली आहे. एप्रिल मध्ये पण Samsung Galaxy X ने WiFi Alliance (WFA) द्वारा WiFi कनेक्शन मिळवले होते. मार्च मध्ये Samsung ने Galaxy X साठी KIPRIS (Korea Intellectual Property Rights Information) वर ट्रेडमार्क एप्लीकेशन दिले होते. 

या लिस्ट मध्ये अजून हार्डवेयर संबंधित कोणतीही माहिती देण्यात आली नाही, आता हा खुलासा करण्यात आला आहे की फोनला आता 4.2 वर्जन सह ब्लूटूथ सर्टिफिकेशन मिळवले आहे. हे थोडे विचित्र वाटते एकीकडे कंपनी आपल्या फ्लॅगशिप फोन Galaxy S8 मध्ये ब्लूटूथ 5.0 देत आहे तर दुसरीकडे आपल्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन मध्ये जुन्या वर्जन चे ब्लूटूथ देत आहे. मागच्या WiFi लिस्टिंग मध्ये खुलासा करण्यात आला होता कि Samsung Galaxy X एंड्राइड 6.0.1 मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo