Samsung Galaxy Tab S4 च्या रेंडर वरून झाला डिजाइनचा खुलासा

Samsung Galaxy Tab S4 च्या रेंडर वरून झाला डिजाइनचा खुलासा
HIGHLIGHTS

रेंडर मध्ये Samsung टॅबलेट बारीक बेजल्स सह दिसत आहे आणि यात होम बटन नाही.

Samsung Galaxy Tab S4’s leaked render shows design: आगामी Samsung Galaxy Tab S4 चे रेंडर ऑनलाइन लीक झाले आहेत. रेंडर मध्ये Samsung टॅबलेट बारीक बेजल्स सह दिसत आहे आणि यात होम बटन नाही. याआधी बोलले जात होते की Tab S4 दोन रंगांमध्ये लॉन्च केला जाईल ज्यात ब्लॅक आणि ग्रे कलर चा समावेश होता. पण आता अंदाज लावला जात आहे की डिवाइस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च होऊ शकतो. 

Samsung Galaxy Tab S4 ची डिजाइन बर्‍याच प्रमाणात Galaxy Tab S3 सारखी आहे. Galaxy Tab S4 मध्ये कोणतेही होम बटन नसेल जो Samsung च्या टॅबलेट्स मधील एक बदल असेल. FCC वर दिसलेल्या आधीच्या रेंडर्स मध्ये टॅबलेट च्या रियर पॅनल वर “ट्यून्ड बाय AKG” चा लेबल दिसला होता ज्यावरून समजते की डिवाइस चांगल्या ऑडियो परफॉरमेंस सह येईल. 
 
हे अजून स्पष्ट झाले नाही की टॅब्लेट मध्ये फिंगरप्रिंट सेंसर कुठे असेल. यात एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो पण Samsung च्या कोणत्याही डिवाइस मध्ये असे काही आपण अजूनतरी पाहिले नाही त्यामुळे असेही असू शकते की डिवाइस मध्ये फिंगरप्रिंट सेंसर नसेलच. 

या नवीन रेंडर्स वरून डिजाइन व्यतिरिक्त माहिती मिळणार नाही. आधीच्या रिपोर्ट्स मध्ये मिळालेल्या माहितीनुसार Samsung Galaxy Tab S4 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट वर चालेल आणि यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असेल. टॅब्लेट मध्ये 7,300mAh ची बॅटरी असू शकते. 

ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर डिवाइस मध्ये एक 13 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा असेल आणि डिवाइस च्या फ्रंट ला 8 मेगापिक्सल चा सेंसर असेल. बोलले जात आहे की या टॅब्लेट मध्ये एंड्राइड 8.1 ओरियो असेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo