Samsung Galaxy S9, Samsung Galaxy S9+ Red Bull Ring Limited एडिशन स्मार्टफोन झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy S9, Samsung Galaxy S9+ Red Bull Ring Limited एडिशन स्मार्टफोन झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

या नवीन एडिशन सह लॉन्च झालेल्या या दोन्ही स्मार्टफोंस मध्ये Red Bull थीम आणि रेस क्लिप्स चा एक्सक्लूसिव एक्सेस पण दिला गेला आहे.

सॅमसंग ने काही महिन्यापुर्वी लॉन्च केल्या गेलेल्या सॅमसंग गॅलेक्सी S9 Duo ला आता नव्या लिमिटेड एडिशन मध्ये लॉन्च करण्यात आले आहेत, हे दोन्ही डिवाइस आता Red Bull Ring Limited Edition मध्ये उपलब्ध होतील. कंपनी ने हे दोन्ही नवीन फ्लॅगशिप एडिशन या नव्या रूपात रेड च्या मोटरस्पोर्ट डिविजन आणि टेलीकॉम कंपनी वोडाफोन सोबत हात मिळवणी करून सादर केला आहे. 
इथे लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे हे दोन्ही डिवाइस या नवीन रुपात तुम्ही 27 एप्रिल पासून विकत घेऊ शकाल. पण हे तुम्ही फक्त नेदरलँड्स मध्ये फक्त वोडाफोन च्या माध्यमातूनच घेतला जाऊ शकतो. 
Samsung Galaxy S9 आणि S9+ मधील फीचर्स पाहता, Galaxy S9 मध्ये 5.8-इंचाचा क्वाड HD+ कर्व्ड सुपर AMOLED डिस्प्ले असेल, तर S9+ मध्ये 6.2-इंचाचा क्वाड HD+ कर्व्ड सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोंस IP68 सर्टिफाइड आहे. Galaxy S9 मध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, तर S9+ मध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. दोन्ही फोंस मध्ये समोरच्या बाजूस 8MP चा कॅमेरा आहे. 
Galaxy S9 मध्ये 4GB रॅम सह 64GB/128GB/256GB स्टोरेज ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे आणि याची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400GB पर्यंत वाढवता येईल. तर S9+ मध्ये 6GB रॅम सह 64GB/128GB/256GB स्टोरेज चे ऑप्शन देण्यात आले आहेत. याची स्टोरेज पण माइक्रोएसडी कार्ड ने 400GB पर्यंत वाढवता येईल. Galaxy S9 मध्ये 3000mAh ची बॅटरी आहे, तर S9+ मध्ये 3500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फास्ट वायर्ड चार्जिंग ला सपोर्ट करतात. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo