Samsung Galaxy S10 स्मार्टफोन च्या वेरिएंट्स मध्ये सामील होतील 5-इंच आणि 6.44-इंचाचे मॉडेल

Samsung Galaxy S10 स्मार्टफोन च्या वेरिएंट्स मध्ये सामील होतील 5-इंच आणि 6.44-इंचाचे मॉडेल
HIGHLIGHTS

असे बोलले जात आहे की Samsung Galaxy S10 स्मार्टफोनचा 6.44-इंचाच्या डिस्प्ले सह येणारा मॉडेल Apple च्या iPhone X Plus ला टक्कर देईल.

Samsung Galaxy S10 Variants to come up with 5-inch and 644-inch Models: काही दिवसांपूर्वी समोर आले आहे की Samsung आपला Samsung Galaxy S10 स्मार्टफोन वेगवेगळ्या तिन वेरिएंट्स मध्ये लॉन्च करणार आहे, हा डिवाइस 2019 मध्ये लॉन्च केल्या जाण्याची शक्यता आहे. या डिवाइस च्या लॉन्च साठी आता जवळपास 6 महीने राहिले आहेत. याबद्दल माहिती आणि रुमर्स येण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. एक नवीन रिपोर्ट या डिवाइस बद्दल अधिक माहिती देत आहे. 

असे बोलले जात आहे की हा स्मार्टफोन ज्या तिन वेगवेगळ्या वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाणार आहे, त्यातील एकात एक छोटा 5-इंचाचा डिस्प्ले असणार आहे, त्याचबरोबर दुसर्‍या मध्ये किंवा असं म्हणूया कि टॉप मॉडेल 6.44-इंचाच्या स्क्रीन सह लॉन्च केला जाऊ शकतो. 5-इंचाच्या मॉडेल बद्दल बोलायचे झाले तर हा काही कमी दर्जाच्या स्पेक्स सह लॉन्च केला जाऊ शकतो, तसेच यात एक फ्लॅट-स्क्रीन असण्याची शक्यता आहे. ही माहिती The Bell च्या एका रिपोर्ट मधून समोर आली आहे. 

असे पण समोर येत आहे की या डिवाइस चा 6.44-इंचाचा मॉडेल जो Samsung Galaxy S10+ स्मार्टफोन च्या रुपात बाजारात येऊ शकतो, कंपनीचा टॉप मॉडेल असेल. या डिवाइस ची तुलना अॅप्पल च्या आगामी आणि रुमर्ड डिवाइस Apple iPhone X Plus सोबत केली जात आहे. या वेरिएंट मध्ये तिन कॅमेरा सेटअप पण असतील. त्याचबरोबर यात एक in-display फिंगरप्रिंट सेंसर पण असणार आहे. 

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अजून एक बातमी असे पण सांगत होती की सॅमसंग गॅलेक्सी S10 डिवाइस मध्ये आईरिस स्कॅनर च्या जागी 3D फेस स्कॅनिंग फीचर सामील केला जाऊ शकतो. The Bell चा एक रिपोर्ट पाहिल्यास सॅमसंग गॅलेक्सी S10 कंपनी चा पहिला असा स्मार्टफोन असणार आहे, जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच या डिवाइस मध्ये फक्त एवढच नसेल. कंपनी ने या डिवाइस साठी एका इजराइली कंपनी मँटिस सोबत भागीदारी केली आहे, जी 3D फेस स्कॅनिंग वर काम करत आहे, हा अॅप्पल च्या iPhone X सोबत मिळता जुळता असेल. 

जर या कामात सॅमसंग ला यश मिळाले तर असे पण बोलू शकतो की कंपनी या डिवाइस मधून आईरिस स्कॅनर काढून टाकू शकते. यामुळे वेट आणि कॉस्ट सेविंग होईल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo