Samsung Galaxy Note 9 स्मार्टफोन S-AMOLED डिस्प्ले आणि Exynos 9810 सह भारतात लॉन्च

Samsung Galaxy Note 9 स्मार्टफोन S-AMOLED डिस्प्ले आणि Exynos 9810 सह भारतात लॉन्च
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Note 9 स्मार्टफोन ब्लूटूथ इनेबल S-Pen सोबत लॉन्च करण्यात आला आहे, जो तुम्ही फोटो क्लिक करण्यासाठी, स्लाइड्स इत्यादी प्रेजेंट करण्यासाठी आणि इतर काही कामांसाठी वापरू शकता.

Samsung ने आज भारतात आपल्या एका इवेंट मधून आपला Samsung Galaxy Note 9 स्मार्टफोन अधिकृतपणे लॉन्च केला आहे. या डिवाइस साठी भारतात प्री-आर्डर ची प्रक्रिया आधीपासून सुरू करण्यात आली होती. तसेच याची भारतातील किंमत सर्वांनाच माहीत होती. पण अजूनतरी स्मार्टफोन च्या उपलब्धते विषयी कोणतीही माहिती समोर आली नव्हती. पण आता समोर येत आहे की हा डिवाइस 24 ऑगस्ट पासून उपलब्ध करण्यात येईल.

Samsung Galaxy Note 9 ची किंमत 

Galaxy Note 9 स्मार्टफोन तीन वेगवेगळ्या रंगात लॉन्च करण्यात आला आहे. हा डिवाइस तुम्ही Midnight Black, Ocean Blue आणि Metallic Copper रंगात घेऊ शकता. तसेच हा दोन वेगवेगळ्या वेरिएंट्स मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. हा तुम्ही 128GB स्टोरेज आणि 512GB स्टोरेज मध्ये घेऊ शकता. याची किंमत क्रमश: Rs 67,900 आणि Rs 84,900 आहे. Metallic Copper कलर वेरिएंट बद्दल बोलायचे तर हा 128GB स्टोरेज मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे, तसेच इतर दोन्ही वेरिएंट तुम्हाला दोन्ही स्टोरेज मध्ये मिळतील. 

Samsung Galaxy Note 9 वर मिळणार्‍या लॉन्च ऑफर

कंपनी आधी पासून भारतात Galaxy Note 9 साठी प्री-ऑर्डर घेत आहे. जर तुम्ही Galaxy Note 9 प्री-बुक केला तर तुम्ही Gear Sport स्मार्टवॉच 4,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकाल, ज्याची खरी किंमत 22,990 रूपये आहे. 21 ऑगस्ट पर्यंत प्री-बुकिंग करता येईल आणि अमेजॉन इंडिया ने सांगितले आहे की 23 ऑगस्ट पासून स्मार्टफोन ची शिपिंग सुरू करण्यात येईल. 

Gear Sport स्मार्टवॉच वर 4,999 रुपयांच्या डिस्काउंट सोबत कंपनी ने Paytm मॉल सोबत भागेदारी करुन 6,000 रुपयांचा कॅशबॅक पण देऊ केला आहे. जर तुम्ही HDFC बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्ही 6,000 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता. 

सॅमसंग ने सॅमसंग अपग्रेड प्रोग्राम ची पण घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत जुना फोन एक्सचेंज केल्यास 6,000 रुपयांचा बोनस डिस्काउंट मिळत आहे. भारतात Samsung Galaxy Note 9 चा सेल 23 ऑगस्ट पासून सुरू होऊ शकतो. हा फ्लॅगशिप स्मार्टफोन सर्व रिटेल आणि ऑनलाइन स्टोर्स वर उपलब्ध होईल. 

Samsung Galaxy Note 9 चे स्पेक्स

Note 9 मध्ये 6.4 इंचाचा QHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो एक इंफिनिटी डिस्प्ले आहे आणि याचे रेजोल्यूशन 2960 x 1440 पिक्सल आहे. डिवाइस च्या कडेला डेडीकटेड बिक्स्बी बटन पण देण्यात आले आहे. जो कंपनीचा वॉइस बेस्ड असिस्टेंट आहे, जो थोडा बदललेला आहे. डिवाइस चार रंगात म्हणजे, ओशेयन ब्लू, लवेंडर पर्पल, मेटॅलिक कॉपर आणि मिडनाइट ब्लॅक रंगात सादर करण्यात आला आहे. 

इतर Galaxy Note लाइनअप प्रमाणे हा डिवाइस पण S पेन सोबत येतो. S पेन मध्ये ब्लुटूथ क्नेक्टिविटी देण्यात आली आहे.  Note 9 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रॉसेसर आणि 8GB रॅम आहे. भारतीय वर्जन मध्ये एक्सिनोस 9810 प्रॉसेसर असेल. हा सॅमसंग चा पहिला असा फोन आहे जो 512 GB स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे आणि याची स्टोरेज माइक्रो एसडी कार्ड ने 512 GB पर्यंत वाढवता येईल. डिवाइस मध्ये 4,000mAh ची बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग आणि फास्ट वायर्लेस चार्जिंग ला सपोर्ट करते. 

ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर Note 9 मध्ये 12MP+12MP चा ड्यूल कॅमेरा देण्यात आला आहे आणि दोन्ही कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS)सोबत येतात. कॅमेरा  ऑटो सीन डिटेक्शन सह येतात. सेल्फी साठी डिवाइस मध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo