Samsung Galaxy Note 9 ला लागली आग, महिलेने दाखल केला खटला

Samsung Galaxy Note 9 ला लागली आग, महिलेने दाखल केला खटला
HIGHLIGHTS

न्यू यॉर्क च्या एका महिलेने आपल्या पर्स मध्ये ठेवलेला फ्लॅगशिप Samsung Galaxy Note 9 ला आग लागल्यानंतर सॅमसंगच्या विरोधात खटला दाखल केला आहे. या आधी Galaxy Note 7 सोबत पण अशीच घटना घडली आहे.

सॅमसंगचा फ्लॅगशिप डिवाइस Galaxy Note 9 ला आग लागल्याच्या बातम्या समोर येत आहेत, पण कंपनीचे CEO DJ Koh ने दावा केला होता कि Galaxy Note 9 मधील बॅटरी आता पर्यंतची सर्वात सुरक्षित बॅटरी असेल. सॅमसंग ने Galaxy Note 9 भारतात 67,900 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला आहे. 

न्यू यॉर्क पोस्ट च्या रिपोर्ट नुसार, न्यू यॉर्क च्या एका महिलेने आपल्या पर्स मध्ये ठेवलेला फ्लॅगशिप Samsung Galaxy Note 9 ला आग लागल्यानंतर सॅमसंग च्या विरोधात खटला दाखल केला आहे. रियल इस्टेट एजेंट Diane Chung यांनी दावा केला आहे की 3 सप्टेंबरला त्यांच्या सोबत ही घटना घडली, जेव्हा त्या एलीवेटर मध्ये होत्या. 

Chung यांचे म्हणणे आहे की जेव्हा त्यांचा नवीन फोन Galaxy Note 9 भरपूर जास्त गरम झाला तेव्हा त्यांनी त्याला आपल्या पर्स मध्ये ठेवले. त्यानंतर आचानक त्यांच्या बॅग मधून धूर आणि आवाज येऊ लागला. जेव्हा Chung यांनी आपली बॅग रिकामी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा बोटांना चटके बसू लागले. 

जेव्हा त्या लॉबी मध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांनी लगेचच ती बॅग फेकून दिली पण तरीही मोबाईल फोन जळतच होता आणि त्यानंतर एका व्यक्तिने एका कापडाच्या मदतीने स्मार्टफोन पकडून तो पाण्याच्या बादलीत टाकला. Chung यांनी क्वीन्स सुप्रीम कोर्टात खटला दाखल केला आहे. या घटनेनंतर त्यांची मागणी आहे की सॅमसंगने Galaxy Note 9 ची विक्री थांबवावी. 

Galaxy Note 9 मध्ये 4,000mAh ची बॅटरी आहे जी सॅमसंगच्या फ्लॅगशिप डिवाइस मध्ये आता पर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी फक्त चांगली परफॉरमेंस देत नाही तर सुरक्षित पण आहे. सॅमसंगचे म्हणणे आहे की डिवाइसने अनेक बॅटरी सेफ्टी चेक्स पार केले आहेत सॅमसंग ने या घटने बद्दल अजूनतरी काहीच विधान केले नाही. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo