Samsung Galaxy M10 आणि M20 ला मिळाला पहिला अपडेट

Samsung Galaxy M10 आणि M20 ला मिळाला पहिला अपडेट
HIGHLIGHTS

नुकत्याच लाँन्च झालेल्या सॅमसंगच्या Galaxy M10 आणि M20 ला पहिला अपडेट मिळाला आहे. कंपनीनुसार 5 फेब्रुवारीला हे फोन्स सेल साठी उपलब्ध केले जातील. हे फोन्स भारतात याच आठवड्यात लॉन्च केले गेले होते.

महत्वाचे मुद्दे:

  • येत आहे जानेवारी सिक्योरिटी पॅच सह
  • 102MB आहे M20 च्या अपडेटची साइज
  • गॅलेक्सी M10 ला मिळाला M105FDDU1ASA7 फर्मवेयर वर्जन

सॅमसंगचे लेटेस्ट फोन Galaxy M10 आणि Galaxy M20 भारतीय मार्केट मध्ये गेल्याच आठवड्यात आणण्यात आले होते. आता या दोन्ही फोन्सना सॉफ्टवेयर अपडेट मिळाला आहे. त्याचबरोबर हे फोन्स 5 फेब्रुवारी पासून सेल साठी यूजर्सना उपलब्ध केले जातील. पण मार्केट मधील काही रिव्यू यूनिट्सना अपडेट मिळाला आहे. हा अपडेट फोनची परफॉर्मेंस सुधारतो. सॅमसंग गॅलेक्सी M10 ला M105FDDU1ASA7 फर्मवेयर वर्जन अपडेट मिळाला आहे आणि सॅमसंग गॅलेक्सी M20 ला M205FDDU1ASA9 फर्मवेयर वर्जन अपडेट मिळाला आहे.

याची माहिती सर्वात आधी SamMobile ने दिली आहे आणि असा दावा केला आहे कि अपडेट फोनची परफॉर्मेंस सुधारतो. हे फोन्स जानेवारी सिक्योरिटी पॅच सह येतात जो मागील फर्मवेयरचा पण भाग होता. रिपोर्टनुसार सॅमसंगचे हे स्मार्टफोन आउट ऑफ बॉक्स नव्या अपडेट सह येतील. Samsung Galaxy M20 साठी अपडेटची साइज 102MB आहे आणि Samsung Galaxy M10 साठी 64.74MB आहे.

सॅमसंग गॅलेक्सीच्या या फोन्सच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Galaxy M10 ची किंमत 7,990 रुपयांपासून सुरु होत आहे. तुम्हाला 2 जीबी रॅम/ 16 जीबी स्टोरेज वेरिएंट या किंमतीती मिळेल तर 3 जीबी रॅम/ 32 जीबी स्टोरेज मॉडेल 8,990 रुपयांमध्ये मिळत आहे. तसेच Galaxy M20 ची किंमत पाहता 3 जीबी रॅम/ 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. सोबतच 4 जीबी रॅम/ 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,990 रुपये सांगण्यात आली आहे.

Samsung Galaxy M10 आणि M20 स्पेसिफिकेशन

ड्यूल सिम सह येणाऱ्या Samsung Galaxy M10 बद्दल बोलायचे झाले तर हा एंड्रॉयड 8.1 ओरियो वर आधारित सॅमसंग एक्सपीरियंस 9.5 वर चालतो. सॅमसंग गॅलेक्सी M10 मध्ये 6.22 इंचाचा एचडी+ (720×1520 पिक्सल) टीएफटी डिस्प्ले आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. ऑक्टा-कोर एक्सीनॉस 7870 प्रोसेसरचा वापर यात झाला आहे. ग्राफिक्स साठी माली जी71 जीपीयू इंटीग्रेटेड आहे. रॅम आणि स्टोरेज वर आधारित हा फोन 2 जीबी रॅम सह 16 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज मध्ये देण्यात आला आहे. यात प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सल (एफ/ 1.9 अपर्चर) चा आहे.

सोबत 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल कॅमेरा देण्यात आला आहे. याचा अपर्चर एफ/ 2.2 आहे. सेल्फी साठी फोन मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. डिवाइस मध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि एफएम रेडियो पण आहे. डिवाइस ड्यूल 4जी वीओएलटीई, वाई-फाई 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5, जीपीएस कनेक्टिविटी फीचर ने सुसज्ज आहे. फोन मध्ये 3430 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

तसेच Samsung Galaxy M20 पाहता यात 6.3 इंचाचा फुल-एचडी+ (1080X2340 पिक्सल) टीएफटी डिस्प्ले आहे. जो आस्पेक्ट रेशियो 19.5:9 सह फोन ऑक्टा-कोर एक्सीनॉस 7904 प्रोसेसर आणि माली जी71 जीपीयू ने सुस्सज आहे. या फोनचे पण दोन वेरिएंट आहेत- ज्यात 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज आहे. डिवाइस एंड्रॉयड 8.1 ओरियो सह येतो आणि यात ड्यूल रियर कॅमेरा सेट-अप आहे. बॅक पॅनल वर एफ/ 1.9 अपर्चर वाला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे.

सोबत एफ/ 2.2 अपर्चरचा 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-एंगल कॅमेरा असेल. सेल्फी साठी एफ/ 2.0 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फिंगरप्रिंट सेंसर सह M20 मध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक, एफएम रेडियो, डुअल 4जी वीओएलटीई, वाई-फाई 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5, जीपीएस देण्यात आले आहेत. या फोनची बॅटरी 5,000 एमएएच ची आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo