Samsung Galaxy J8 ला लवकरच होऊ शकतो लॉन्च, समोर आला हा खुलासा

HIGHLIGHTS

Samsung Galaxy J8 गीकबेंच वर दिसला आहे.

Samsung Galaxy J8 ला लवकरच होऊ शकतो लॉन्च, समोर आला हा खुलासा

सॅमसंग ने काही दिवसांपूर्वी MWC 2018 दरम्यान आपले दोन नवीन फ्लॅगशिप डिवाइस Samsung Galaxy S9 आणि Galaxy S9+ सादर केले होते. पण सॅमसंग लवकरच बाजारात आपले अन्य डिवाइस सादर करू शकतो. 
कारण आता सॅमसंग च्या J सीरीज चा एक नवीन स्मार्टफोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर दिसला आहे. या डिवाइस चा मॉडल नंबर SM-J800FN आहे. अंदाज लावला जात आहे की हा फोन Samsung Galaxy J8 असू शकतो. गीकबेंच वरील या लिस्टिंग वरून या फोन च्या काही स्पेक्स बद्दल पण खुलासा झाला आहे. 
प्राप्त माहितीनुसार, या फोन मध्ये Exynos 7870 चिपसेट असू शकतो. तसेच यात 3GB रॅम पण असू शकतो. हा एंड्राइड ओरियो वर चालण्याची शक्यता आहे. 
 
या डिवाइस चा सिंगल-कोर स्कोर 728 आहे, तर याचा मल्टी-कोर स्कोर 3683 आहे. 
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo