भारतात लाँच झाला सॅमसंग गॅलेक्सी J3 (6), किंमत ८,९९० रुपये

भारतात लाँच झाला सॅमसंग गॅलेक्सी J3 (6), किंमत ८,९९० रुपये
HIGHLIGHTS

ह्या स्मार्टफोनला आपण स्नॅपडिलच्या माध्यमातून एक्सक्लूसिव्हरित्या खरेदी करु शकता. हा स्मार्टफोन चीनमध्ये मागील वर्षीच लाँच झाला होता.

सॅमसंगने भारतात आपला नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी J3 (6) लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ८,९९० रुपये ठेवण्यात आली आहे. ह्या स्मार्टफोनला आपण स्नॅपडिलच्या माध्यमातून एक्सक्लूसिवरित्या खरेदी करु शकता. हा स्मार्टफोन चीनमध्ये मागील वर्षीच लाँच झाला होता.

 

हा एक ड्यूल-सिम सपोर्ट स्मार्टफोन आहे, ज्यात ५ इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले 1280×720 पिक्सेल असणार आहे. त्याशिवाय ह्यात 1.5GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर आणि 1.5GB ची रॅम दिली आहे. फोनमध्ये आपल्याला 8GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकता. स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपसह सॅमसंग आपल्या टचविज UI वर चालतो.

 

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 8MP चा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. स्मार्टफोनमध्ये 2600mAh क्षमतेची उत्कृष्ट बॅटरी मिळत आहे. त्याशिवाय स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी पर्यायाबाबत बोलायचे झाले तर, ह्यात आपल्याला 4G सपोर्टसह 3G, वायफाय, ब्लूटुथ, GPS आणि मायक्रो-USB फीचर मिळत आहे.

स्मार्टफोनमध्ये “S Bike Mode” असल्यामुळे हा फायदा होणार आहे की, जर आपण बाइक चालवत असाल आणि कोणी तुम्हाला फोन करत असेल, तर तो ऑटोमेटिक कॉलरला ‘आपण नंतर कॉलर करा’

असा टेक्स्ट मेसेज पाठवेल. हे फीचर असण्यामुळे बायकर्सला आपल्या बाइक राइडवर लक्ष केंद्रित करता येईल आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी होईल.

हेदेखील वाचा – 4GB रॅमने सुसज्ज असलेला सॅमसंग गॅलेक्सी A9 प्रो स्मार्टफोन सादर

हेदेखील वाचा – आता इन्स्टाग्रामवर १ मिनिटांचा व्हिडियो अपलोड करता येणार

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo