Samsung Galaxy J2 (2018) स्मार्टफोन Samsung Mall सारख्या दमदार फीचर सह झाला लॉन्च, किंमत Rs 8,190

HIGHLIGHTS

सॅमसंग ने भारतात सॅमसंग मॉल फीचर सह आपला सॅमसंग गॅलेक्सी J2 (2018) स्मार्टफोन लॉन्च केला आहे, भारतात या स्मार्टफोन ची किंमत Rs 8,190 आहे.

Samsung Galaxy J2 (2018) स्मार्टफोन Samsung Mall सारख्या दमदार फीचर सह झाला लॉन्च, किंमत Rs 8,190

सॅमसंग ने भारतात आपला अजून एक नवीन स्मार्टफोन आपल्या मोठ्या स्मार्टफोन यादीत सामील केला आहे, कंपनी ने आपला सॅमसंग गॅलेक्सी J2 (2018) स्मार्टफोन लॉन्च केला आहे आणि या डिवाइस ची सर्वात खास बात याचे सॅमसंग मॉल सह लॉन्च होणे. हा फीचर कंपनी ने सर्वात आधी सॅमसंग गॅलेक्सी On7 Prime स्मार्टफोन सह लॉन्च केला होता आणि हा फीचर खुप लोकांना आवडला होता. 
आपल्या लॉन्च च्या आधी पासून सॅमसंग गॅलेक्सी J2 (2018) स्मार्टफोन लीक च्या माध्यमातून आपल्या समोर येत होता. आणि आता हा लॉन्च झाला आहे. भारतात या स्मार्टफोन ची सरळ टक्कर Xiaomi Redmi 5A स्मार्टफोन शी होणार आहे, जो कमी किंमतीत तुम्हाला खुप काही देत आहे. सॅमसंग चा हा नवीन फोन Rs 8,190 च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. 
स्पेक्स च्या बाबतीत या नवीन फोन मध्ये जुन्या फोनच्या तुलनेत काही बदल करण्यात आले आहेत, पण किंमत जवळपास सारखीच ठेवण्यात आली आहे. फोन मध्ये तुम्हाला एक 5-इंचाचा Super AMOLED डिस्प्ले मिळत आहे, जो 960×540 पिक्सल रेजोल्यूशन सह येतो. त्याचबरोबर हा डिवाइस तुम्हाला गोल्ड, ब्लॅक आणि पिंक इत्यादी रंगात मिळेल. 
फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे आणि यात 2GB च्या रॅम सह 16GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने 256GB पर्यंत वाढवू शकता. फोन मध्ये एक 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, तसेच यात एक 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे. या दोन्ही कॅमेरा सोबत तुम्हाला LED फ्लॅश मिळत आहे.  

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

फोन एंड्राइड 7.1 नौगट सह लॉन्च करण्यात आला आहे, सोबतच यात एक 2600mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo