सॅमसंग गॅलेक्सी J मॅक्स स्मार्टफोन फ्लिपकार्ट झाला उपलब्ध, किंमत १३,४०० रुपये

HIGHLIGHTS

सॅमसंग गॅलेक्सी J मॅक्स स्मार्टफोन आपल्याला दोन रंगांत म्हणजेच काळ्या आणि सोनेरी रंगात उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी J मॅक्स स्मार्टफोन फ्लिपकार्ट झाला उपलब्ध, किंमत १३,४०० रुपये

फ्लिपकार्टवर खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी J मॅक्स १३,४०० रुपयात

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

सॅमसंग गॅलेक्सी J मॅक्स स्मार्टफोन मागील महिन्यात लाँच झाला आहे. मात्र आता हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर १३,४०० रुपयाच्या किंमतीत उपलब्ध झाला आहे. हा दोन रंगांत म्हणजेच काळ्या आणि सोनेरी रंगात उपलब्ध होईल. ह्या स्मार्टफोनसह आपल्याला मोफत ब्लूटुथ हेडसेट आणि Viu चे एक वर्षाचे मोफत सब्सक्रिप्शन सुद्धा मिळत आहे. ही एक व्हिडियो ऑन डिमांड सेवा आहे.

ह्यात ७ इंचाची TFT WXGA डिस्प्ले दिली आहे. ज्याचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. हा फोन 1.5GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5GB च्या रॅमने सुसज्ज आहे. ह्याला 16GB च्या अंतर्गत स्टोरेजसह लाँच केले आहे.

हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू

हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ह्यात 8MP चा रियर कॅमेरा आणि 2MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.

हेदेखील वाचा – फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…

हा 4000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. ह्यात VoLTE 4G सपोर्ट देण्यात आले आहे.

हेदेखील वाचा – Rcom ने लाँच केला नवीन MoviNet प्लान, किंमत २३५ रुपये प्रति महिना
हेदेखील वाचा – TCL 562 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत १०,९९० रुपये

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo