Samsung Galaxy A7 (2018) ट्रिपल कॅमेरा सह तीन वेरिएंट मध्ये झाला लॉन्च

Samsung Galaxy A7 (2018) ट्रिपल कॅमेरा सह तीन वेरिएंट मध्ये झाला लॉन्च
HIGHLIGHTS

सॅमसंग ने आपला पहिला ट्रिपल कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर केला आहे, पण अजूनतरी या स्मार्टफोन च्या किंमती बद्दल कोणताही खुलासा झाला नाही.

कित्येक महिन्यांच्या लीक्स आणि अफवांनंतर सॅमसंग ने आपला या वर्षीचा नवीन Galaxy A7 स्मार्टफोन अधिकृतपणे लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनच्या बॅकला कंपनी ने ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. 

सॅमसंग याला फक्त Galaxy A7 बोलत आहे, पण रिटेल बॉक्सिंग वर 2018 टॅग दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्यातरी Galaxy A7 (2018) यूरोप आणि आशियाच्या काही बाजारांत सादर केला जाईल आणि त्यानंतर इतर बाजारांत हा डिवाइस येईल. हा स्मार्टफोन ब्लू, ब्लॅक, गोल्ड आणि पिंक कलर च्या ऑप्शनस मध्ये उपलब्ध होईल. कंपनी ने अजूनतरी डिवाइसच्या किंमती बद्दल कोणताही खुलासा केला नाही पण रुमर्स नुसार याची किंमत $400 (Rs 28,826 जवळपास ) असेल. 

Samsung Galaxy A7 (2018) स्पेक्स
Samsung Galaxy A7 (2018) मध्ये 6 इंचाचा फुल FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 1080×2220 पिक्सल आहे आणि हा सुपर AMOLED इनफिनिटी डिस्प्ले आहे. अजूनतरी हा डिवाइस कोणत्या SoC वर चालेल याची माहिती देण्यात आली नाही, पण चिपसेट 2.2GHz वर क्लोक्ड असेल. गॅलेक्सी A7 (2018) मध्ये 3,300mAh ची बॅटरी आहे आणि हा एंड्राइड 8.0 ओरियो वर आधारित आहे. 

हा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A7 (2018) 4GB/64GB, 4GB/128GB आणि 6GB/128GB वेरिएंट मध्ये सादर करण्यात येईल. तसेच डिवाइसची स्टोरेज माइक्रो एसडी कार्ड ने 512GB पर्यंत वाढवता येईल. सॉफ्टवेयर फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर यात डॉल्बी एटमोस, सॅमसंग पे आणि बिक्स्बी (बिक्स्बी वॉयस सपोर्टच्या वीना ) यांचा समावेश आहे. 

Samsung Galaxy A7 (2018) चा कॅमेरा 
Galaxy A7 (2018) सॅमसंग चा पहिला असा स्मार्टफोन आहे जो ट्रिपल कॅमेरा सेटअप सह सादर करण्यात आला आहे. डिवाइस मध्ये 24 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर f/1.7 अपर्चर लेंस सह देण्यात आला आहे, तसेच 8 मेगापिक्सल च्या अल्ट्रा-वाइड सेंसर सह F/2.4 अपर्चर लेंस देण्यात अली आहे जी वाइड-एंगल फोटोज क्लिक करण्याच्या कामी येईल तसेच तिसरा 5 मेगापिक्सलचा सेंसर f/2.2 अपर्चर लेंस डेप्थ सेंसर सह येतो. 

सॅमसंग ने बोकेह इफेक्ट साठी वाइड एंगल आणि डेप्थ लेंस ला एक साथ कंबाइन केले आहे. त्याचबरोबर, इतर फीचर्स मध्ये सेल्फी फोकस, प्रो लाइटिंग मोड, AR इमोजी, फिल्टर्स आणि सीन ऑप्टीमाइजर फीचर आहेत. Galaxy A7 (2018) मध्ये 24 मेगापिक्सलचा सेंसर आहे जो f/2.0 अपर्चर लेंस सह येतो. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo