सॅमसंग आपला Galaxy M20 स्मार्टफोन करू शकते वॉटरड्रॉप नॉच सह लॉन्च

सॅमसंग आपला Galaxy M20 स्मार्टफोन करू शकते वॉटरड्रॉप नॉच सह लॉन्च
HIGHLIGHTS

सॅमसंग पुढ्ल्यावर्षीच्या सुरवातीला आपला Galaxy M20 स्मार्टफोन लॉन्च करू शकते जो वॉटरड्रॉप नॉच सह येईल.

असे बोलले जात आहे की सॅमसंग आपली गॅलेक्सी  J, On आणि C सीरीज एकत्र करून एक गॅलेक्सी M सीरीज बनवण्याच्या दृष्टीने काम करत आहे. गेल्या काही काळात Samsung Galaxy M10 बद्दल अनेक बातम्या समोर आल्या आहेत पण आता या सीरीजच्या एका नवीन स्मार्टफोन Galaxy M20 बद्दल रिपोर्ट समोर आला आहे.91mobiles च्या रिपोर्ट नुसार डिवाइसच्या डिस्प्ले पॅनेलचा फोटो समोर आला आहे. पॅनल च्या फोटो अनुसार Galaxy M20 मध्ये वॉटरड्रॉप नॉच दिली जाईल जिचा कंपनीच्या वार्षिक डेवलपर कांफ्रेंस मध्ये दाखवण्यात आलेल्या डिजाइन्स मध्ये समावेश नव्हता.

फोटो मधून माहिती मिळते की पॅनलच्या किनाऱ्यांवर कर्व देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या टॉपला नॉच आहे ज्यात सिंगल कॅमेऱ्याला जागा देण्यात आली आहे. भारतात ओप्पो ने सर्वात आधी आपल्या F9 आणि F9 Pro डिवाइसेज सोबत वॉटरड्राप नॉच सादर केली होती पण सॅमसंगने Infinity O, Infinity U, Infinity V आणि नवीन इनफिनिटी डिस्प्ले दाखवताना वॉटरड्रॉप नॉचचा उल्लेख केला नव्हता.
 
Samsung Galaxy M20 स्मार्टफोन एक्सिनोस 7885 SoC द्वारा संचालित केला जाऊ शकतो ज्यात 3GB रॅम असेल. स्मार्टफोन मध्ये 32GB ची इंटरनल स्टोरेज असण्याची शक्यता आहे जी माइक्रो एसडी कार्ड ने वाढवता येईल. गीकबेंचच्या लिस्टिंगनुसार प्रोसेसर आठ कोर्स सह 1.6GHz क्लॉक स्पीड ऑफर करेल आणि Antutu लिस्टिंगनुसार स्मार्टफोन एंड्राइड 8.1 ओरियो वर चालेल. 
 
रिपोर्टनुसार सॅमसंग ने आपल्या नॉएडा मधील फॅक्टरी मध्ये आधीच Galaxy M20 आणि Galaxy M10 स्मार्टफोन्सचे प्रोडक्शन सुरु केले आहे. हे स्मार्टफोन्स 2019 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केले जाऊ शकतात. डिवाइस मध्ये 6 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता जायचे रेजोल्यूशन 1080×2340 पिक्सल असेल. तसेच हा 16MP च्या रियर कॅमेरा आणि 5MP च्या फ्रंट कॅमेरा सह येऊ शकतो आणि रियर कॅमेरा मध्ये LED फ्लॅश पण दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोन मध्ये 3300 mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo