6GB रॅम सह लॉन्च होईल Redmi Note 7 Pro स्मार्टफोन

6GB रॅम सह लॉन्च होईल Redmi Note 7 Pro स्मार्टफोन
HIGHLIGHTS

नव्या रिपोर्टनुसार Redmi Note 7 Pro स्मार्टफोन 6GB रॅम आणि 64GB तसेच 128GB इंटरनल स्टोरेज सह सादर केला जाऊ शकतो.

Xiaomi लवकरच आपला नवा Redmi Note 7 Pro स्मार्टफोन लॉन्च करू शकते. रेड्मीचे हेड Lu Weibing ने वेबो वर एक युजरला रिप्लाई करताना असे सांगितले कि Redmi Note 7 Pro 6GB रॅम आणि 64GB तसेच 128GB इंटरनल स्टोरेज सह सादर केला जाईल.

मागील अनेक रिपोर्ट्स मध्ये सावर आले आहे कि हा आगामी Redmi Note 7 Pro स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 प्रोसेसर ने सुसज्ज असेल आणि आता या नव्या रिपोर्ट मधून स्पष्ट झाले आहे कि नवीन डिवाइस स्नॅपड्रॅगॉन 675 सह येईल. Redmi Note 7 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर सह सादर केला गेला आहे.

Redmi Note 7 बद्दल बोलायचे तर या डिवाइस मध्ये 6.3 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2340×1080 पिक्सलच्या फुल HD+ रेजोल्यूशन सह येतो आणि याचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 आहे. Redmi Note 7 पहिला रेड्मी फोन आहे जो ग्लास बॅक, वॉटरड्रॉप नॉच आणि फ्रंट आणि रियर पॅनल वर 2.5D ग्लास देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 SoC द्वारा संचालित आहे जो ओक्टा कोर प्रोसेसर आहे आणि हा 14nm प्रोसेस वर Kryo 260 कोर्स सह बनवण्यात आला आहे आणि डिवाइस मध्ये एड्रेनो 512 GPU आहे.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर Redmi Note 7 पहिला असा बजेट डिवाइस आहे ज्यात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. डिवाइसच्या मागील बाजूस 48 मेगापिक्सलचा सॅमसंग GM1 इमेज सेंसर देण्यात आला आहे आणि या सेंसर सोबत एक 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर पण आहे. रेड्मी नोट 7 च्या फ्रंटला 13 मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा आहे. Redmi Note 7 मध्ये देण्यात आलेला कॅमेरा सेटअप AI फीचर्स सह येतो ज्यात सीन रेकोग्निशन, AI पोर्ट्रेट मोड आणि AI ब्यूटी मोड आहेत.

रेड्मी नोट 7 मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि हा ब्लू, गोल्ड, ट्वीलाइट ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, GPS, IR ब्लास्टर, एक USB टाइप-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक ऑफर करतो. या स्मार्टफोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी मौजूद आहे आणि आता या स्मार्टफोनच्या उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही पण आशा आहे कि लवकरच स्मार्टफोन भारतीय बाजारात पण लॉन्च केला जाईल.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo