बघा आज कोणत्या किंमतीत लॉन्च होऊ शकतो Redmi Note 7

बघा आज कोणत्या किंमतीत लॉन्च होऊ शकतो Redmi Note 7
HIGHLIGHTS

Xiaomi ने Redmi Note 7 सोबत काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला आणि आज तो दिवस आला आहे जेव्हा हा फोन चीन नंतर भारतीय मार्किट मध्ये येत आहे. हा फोन कंपनी 10,000 रुपयांमध्ये लॉन्च करू शकते.

महत्वाचे मुद्दे:

  • नवी दिल्ली मध्ये आयोजित होईल रेडमी नोट 7 लॉन्च इवेंट
  • 10,000 रुपयांमध्ये लॉन्च होऊ शकतो Redmi Note 7

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी आपल्या सब ब्रँन्ड रेडमीचा लेटेस्ट फोन Redmi Note 7 28 फेब्रुवारी म्हणजे आज दिल्ली मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये लॉन्च करणार आहे. या फोन Redmi Note 7 कंपनीने चीन मध्ये आधीच लॉन्च केला आहे. या फोनची खासियत याचा 48MP चा रियर कॅमेरा आहे. सोबतच यात 6.3 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे.

फोन डुअल सिम स्लॉट सह MIUI 9 आधारित एंड्रॉयड ओरियो वर चालेल. तसेच यात 2.2 गीगाहर्ट्ज स्नॅपड्रॅगॉन 660 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे जो 3GB RAM, 4GB RAM आणि 6GB RAM सह लॉन्च केला गेला आहे. इतकेच नव्हे तर यात 32GB आणि 64GB ची इंटरनल स्टोरेज पण आहे. तुम्हाला यात 4,000mAh ची बॅटरी मिळते. हा फोन फंकी कलर्स मध्ये येऊ शकतो ज्यात पिंक, रेड, ब्लू आणि ब्लॅकचा समावेश आहे.

अशी असू शकते Xiaomi Redmi Note 7 ची अंदाजे किंमत

चीन मध्ये लॉन्च झालेल्या हुएRedmi Note 7 च्या किंमती बद्दल बोलायचे तर कंपनी ने याची सुरवातीची किंमत 999 चीनी युआन म्हणजे 10,300 रुपये ठेवली आहे. त्यामुळे असे बोलले जात आहे कि याच किंमतीत किंवा याच्या आसपास हा फोन कंपनी भारतात आणू शकते. तसेच कंपनी ने हा फोन दोन वेरिएंट 3GB+32GB आणि 4GB+64GB इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला आहे, ज्याची किंमत जवळपास 1,199 युआन आणि 1,399 युआन म्हणजे 12,400 रुपये आणि 14,500 रुपये आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo