REDMI NOTE 6 PRO मोबाईल फोनच्या 6GB रॅम वेरिएंटच्या किंमतीत RS 2,000 ची कपात

REDMI NOTE 6 PRO मोबाईल फोनच्या 6GB रॅम वेरिएंटच्या किंमतीत RS 2,000 ची कपात

Redmi भारतात एक मोठा स्मार्टफोन ब्रान्ड बनत आहे. विशेष म्हणजे आपला Redmi Note 7 Pro मोबाईल फोन लॉन्च केल्यानंतर कंपनीने आपला Redmi Note 7S मोबाईल फोन पण लॉन्च केला होता, आता असे समोर येत आहे कि कंपनी भारतात एक नवीन मोबाईल फोन पण लॉन्च करू शकते. असे बोलले जात आहे कि Redmi K20 मोबाईल फोन भारतात लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. आपल्या नवीन स्मार्टफोन सोबतच Xiaomi ने आपल्या जुन्या स्मार्टफोन्सच्या किंमती पण कमी करते. असेच यावेळी पण होत आहे. Redmi Note 6 Pro मोबाईल फोनच्या 6GB रॅम मॉडेलच्या किंमतीत Rs 2,000 ची कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता तुम्ही हा मोबाईल फोन Rs 13,999 मध्ये विकत घेता येईल. 

XIAOMI REDMI NOTE 6 PRO च्या किंमतीत कपात

तुम्ही कमी किंमतीत आता Redmi Note 6 Pro मोबाईल फोन Flipkart, Mi.com, Mi Home Stores वरून विकत घेता येईल. तसेच तुम्हाला इतर काही ऑफर्स पण मिळत आहेत. जसे कि जियो यूजर्सना या मोबाईल फोन सोबत Rs 2,400 चा इंस्टंट कॅशबॅक पण मिळत आहे. तसेच तुम्हाला 6TB 4G डेटाचा पण लाभ मिळत आहे. त्याचबरोबर तुम्हाला फोन सोबत एक एक्सचेंज आणि एक नो-कॉस्ट EMI ऑप्शन पण मिळत आहे. तसेच तुम्हाला Axis Bank Buzz क्रेडिट कार्ड वर पण ऑफर्स मिळत आहेत.  

XIAOMI REDMI NOTE 6 PRO स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Xiaomi Redmi Note 6 Pro एंड्रॉयड 8.1 ओरियो वर आधारित मीयूआई 10 वर चालतो. यात 6.26 इंचाचा फुल-एचडी+ आईपीएस एलसीडी फुल स्क्रीन पॅनलचा वापर केला गेला आहे. 19:9 आस्पेक्ट रेश्यो सह यात 86% स्क्रीन टू बॉडी रेश्यो देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये 14एनएम ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत स्क्रीन प्रोटेक्शन साठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आहे. 

ग्राफिक्स साठी एड्रेनो 509 जीपीयू इंटिग्रेटेड आहे. कॅमेरा सेट-अप पाहता Xiaomi Redmi Note 6 Pro च्या बॅक पॅनल वर ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्राइमरी सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे आणि सेकेंडरी 5 मेगापिक्सल सेंसर सह येतो. या डिवाइसचा रियर कॅमेरा ड्यूल पिक्सल ऑटोफोकस, 1.4 माइक्रोन पिक्सल्स आणि एआई पोर्ट्रेट 2.0 सह येतो. इतकेच नव्हे तर स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनल वर पण दोन कॅमेरा देण्यात आले आहेत ज्यात प्राइमरी सेंसर 20 मेगापिक्सल आणि सेकेंडरी सेंसर 2 मेगापिक्सलचा आहे. 

कनेक्टिविटी फीचर मध्ये यूजर्सना 4जी वीओएलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, माइक्रो-यूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक मिळत आहे. एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, इलेक्ट्रॉनिक कंपास, जायरोस्कोप, आईआर ब्लास्टर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि फिंगरप्रिंट सेंसर या फोन मध्ये आहेत. फोनची बॅटरी 4000 एमएएच ची आहे आणि हि क्वालकॉम क्विक चार्ज 3.0 ला सपोर्ट करते. 

 

 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo