REALME X2 VS REALME XT: इथे जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स मधील फरक

REALME X2 VS REALME XT: इथे जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स मधील फरक
HIGHLIGHTS

Realme ने त्यांच्या X सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले जात आहे. या सीरीज मध्ये कंपनीने आपले दोन नवीन मोबाईल फोन्स म्हणजे Realme XT आणि Realme X2 सादर केला आहे. Realme X2 mobile Phone कंपनीने चीनच्या बाजारात लॉन्च केला आहे. तसेच Realme XT भारतात लॉन्च केला गेला आहे. या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये तुम्हाला क्वाड-कॅमेरा सेटअप मिळत आहे, तसेच या दोघांच्या किंमतीत तुम्हाला थोडा फरक दिसेल. खास बाब अशी आहे कि हे दोन्ही फोन्स 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च केले गेले आहेत. याचा अर्थ असा कि चीन मध्ये आता तुम्हाला 64MP कॅमेरा असलेले दोन मोबाईल फोन मिळणार आहेत. एक Xiaomi Redmi Note 8 Pro म्हणून लॉन्च केला गेला आहे, याव्यतिरिक्त एक Mobile Phone Realme X2 म्हणून लॉन्च केला गेला आहे. आज आम्ही या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स वर एक नजर टाकणार आहोत, आणि तुम्हाला सांगणार आहोत कि सर्व फीचर्स पाहता हा स्मार्टफोन्स कसा आहे.  

REALME X2 VS REALME XT: किती आहे किंमत?

Realme X2 स्टार मॅप ब्लू आणि सिल्वर विंग वाइट कलर मध्ये सादर केला गेला आहे. Realme X2 च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरीएंट तसेच 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंटची किंमत क्रमश: 1,599 Yuan (~$224) आणि 1,899 Yuan (~$266) ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोन चीन मध्ये रियलमीच्या अधिकृत वेबसाइट वर प्री-ऑर्डर साठी सादर केला गेला आहे. Realme X2 27 सप्टेंबर पासून सेल केला जाईल. तसेच Realme XT मोबाईल फोनची किंमत पाहता Realme XT चा 6GB RAM + 64GB मॉडेल जवळपास RS 16,999 मध्ये घेता येईल, तसेच फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरीएंट तुम्ही जवळपास Rs 18,999 मध्ये घेऊ शकता.

REALME X2 VS REALME XT: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर

Realme X2 6.4 इंचाच्या S-AMOLED डिस्प्ले सह सादर केला गेला आहे ज्याच्या वरच्या बाजूला एक ड्यूड्रॉप नॉच आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 आहे आणि डिस्प्ले 1080 x 2340 पिक्सल चा फुल HD+ रेजोल्यूशन ऑफर करतो. हँडसेटचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 91.1 टक्के आहे.

Realme X2 कंपनीचा पहिला फोन आहे जो 8nm स्नॅपड्रॅगॉन 730G चिपसेट सह आला आहे जो 2.2 GHz वर क्लोक्ड आहे. डिवाइस 6GB आणि 8GB LPDDR4X RAM विकल्पांसह आला आहे तसेच स्टोरेज साठी 64GB, 128GB आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे, पण 256GB स्टोरेज वेरीएंट अजून सेल साठी उपलब्ध झाला नाही. Realme X2 मध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी microSD कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

Realme X2 मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचा अपर्चर f/2.0 आहे. फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे ज्यात 64 मेगापिक्सलचा Samsung GW1 सेंसर देण्यात आला आहे आणि याचा अपर्चर f/1.8 आहे, ज्याद्वारे यूजर्स 9280 x 6944 पिक्सलचे अल्ट्रा-हाई रेजोल्यूशन फोटो शूट करू शकतात. तसेच, कॅमेरा सेटअप मध्ये 8 मेगापिक्सलची सुपरवाइड लेंस आहे आणि तिचा अपर्चर f/2.25 आहे. इतर दोन कॅमेरा सेटअप मध्ये एक 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस तसेच 2 मेगापिक्सलची पोर्ट्रेट लेंस देण्यात आली आहे. Realme X2 ला 30fps वर 4K विडियो रिकॉर्डिंग सपोर्ट मिळतो. फ्रंट आणि रियर कॅमेरा सेटअप मध्ये विडियो रिकॉर्डिंग साठी इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन सपोर्ट देण्यात आला आहे.  

स्मार्टफोन एंड्राइड 9 पाई वर आधारित कस्टम-मेड ColorOS 6.1 सह येतो. चांगल्या परफॉरमेंस साठी Realme X2 मध्ये फ्रेम बूस्ट 2.0 आणि टच बूस्ट 2.0 चा समावेश करण्यात आला आहे.

Realme X2 मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा कंपनीचा पहिला फोन आहे जो OPPO च्या 30W VOOC 4.0 फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजी सह सादर केला गेला आहे. कनेक्टिविटी साठी डिवाइस मध्ये डुअल-सिम सपोर्ट, 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.0, GPS, NFC, USB-C आणि 3.5mm ऑडियो जॅक देण्यात आला आहे.

Realme  XT स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला एक 6.4-इंचाची full-HD+ Super AMOLED स्क्रीन मिळत आहे, तसेच यात तुम्हाला एक वाटरड्राप नॉच पण मिळत आहे. फोन मध्ये Qualcomm Snapdragon 712 AIE हा एक ओक्टा-कोर प्रोसेसर आहे, जो 10nm प्रोसेस वर बनलेला आहे. स्मार्टफोन म्हणजे Realme XT मधील स्टोरेज आणि रॅम वेरीएंट्स बद्दल बोलायचे तर हा मोबाईल फोन 4GB, 6GB आणि 8GB रॅम मॉडेल मध्ये येणार आहे, तसेच स्टोरेज जवळपास 128GB पर्यंत असेल.  

फोन मध्ये तुम्हाला एक 4000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. जी 20 W फास्ट चार्जिंग सह येते. हा एक VOOC 3.0 फ्लॅश चार्ज सह येतो. याव्यतिरिक्त फोन मध्ये तुम्हाला कलर OS 6 मिळतो, जो तुम्हाला डार्क मोड सह मिळतो. फोन मध्ये डॉल्बी Atmos स्पीकर्स पण देण्यात आले आहेत. तुम्ही फॉन्ट्स पण यात कस्टमाइज करू शकता. फोन मध्ये डिजिटल वेल्बिंग आणि ऍप क्लोन पण देण्यात आला आहे.

कॅमेरा इत्यादी बद्दल बोलायचे तर Realme XT कंपनीचा असा पहिला मोबाईल फोन आहे जो 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च केला जात आहे. तसेच हा भारतातील पण अश्या कॅमेऱ्यासह लॉन्च होणारा पहिला मोबाईल फोन आहे, याआधी चीनच्या बाजारात Redmi Note 8 Pro पण 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला आहे. मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक क्वाड-रियर कॅमेरा सेटअप मिळतो. Realme 5 मध्ये पण क्वाड-रियर कॅमेरा सेटअप मिळाला होता.  

Realme XT मध्ये एक 8MP चा वाइड-अँगल कॅमेरा देण्यात आला आहे, फोन मध्ये तुम्हाला एक 2MP ची मॅक्रो-लेंस आणि एक 2MP चा डेप्थ सेंसर पण मिळत आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर तुम्हाला एक 16MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. Realme XT मोबाईल फोन मध्ये तुम्हाला USB Type C पोर्ट मिळतो, तसेच तुम्हाला यात एक 3.5mm चा हेडफोन जॅक पण मिळतो.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo