फ्लिपकार्ट वर Nokia 7.1 ची किंमत झाली कमी

फ्लिपकार्ट वर Nokia 7.1 ची किंमत झाली कमी
HIGHLIGHTS

फ्लिपकार्ट वर Nokia 7.1 स्मार्टफोनच्या किंमतीवर डिस्काउंट दिला जात आहे ज्यामुळे स्मार्टफोन Rs 19,099 मध्ये विकत घेता येईल.

महत्वाचे मुद्दे

  • Nokia 7.1 वर मिळत आहे डिस्काउंट
  • SBI आणि एक्सिस क्रेडिट कार्ड युजर्स मिळवू शकतात ऑफर्स
  • ऑफलाइन स्टोर्स वर पण सेल मध्ये उपलब्ध आहे Nokia 7.1

 

HMD ग्लोबल ने काही दिवसांपूर्वीच आपला Nokia 7.1 स्मार्टफोन लॉन्च केला होता आणि आता फ्लिपकार्ट वर या स्मार्टफोनची किंमत कमी होताना दिसत आहे. जर तुम्ही नोकियाचा हा नवीन एंड्राइड वन स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असाल तर फ्लिपकार्ट वर मिळणाऱ्या ऑफरचा लाभ घेऊ शकता ज्यांतर्गत या स्मार्टफोनच्या किंमत वर Rs 900 ची सूट दिली जात आहे. फ्लिपकार्ट वर डिवाइस Rs 19,999 ऐवजी Rs 19,099 मध्ये विकत घेता येईल. नोकियाचा हा स्मार्टफोन अनेक ऑनलाइन पोर्टल्स द्वारा सेल केला जात आहे ज्यात फ्लिपकार्ट आणि नोकिया.कॉम चा समावेश आहे, सोबतच डिवाइस भारतात नोकियाच्या ऑफलाइन डीलर्स द्वारा पण विकत घेता येईल.

Nokia 7.1  डिस्काउंट आणि ऑफर्स

लक्षात असू दे कि Nokia 7.1 चा फक्त ग्लॉस मिडनाईट ब्लू कलर वेरिएंट यात विकत घेत येईल, कारण ग्लॉसी स्टील वेरिएंट फ्लिपकार्ट वर Rs 19,650 मध्ये विकत घेतला जाऊ शकतो. हा फोन फक्त एकाच वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे ज्यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. फ्लिपकार्ट वर डिवाइस SBI क्रेडिट कार्ड द्वारा खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळत आहे. तसेच एक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्स EMI द्वारा विकत घेऊन 5 टक्क्यांचा डिस्काउंट मिळवू शकतात आणि सोबतच एक्सिस बँक बज क्रेडिट कार्ड द्वारा केलेल्या खरेदीवर अतिरिक्त 5 प्रतिशत डिस्काउंट मिळू शकतो.

Nokia 7.1 स्पेसिफिकेशन्स

जर Nokia 7.1 मोबाइल फोनच्या डिजाईन इत्यादी बद्दल बोलायचे झाले तर हा फोन जवळपास Nokia 6.1 Plus आणि Nokia 5.1 Plus सारखाच आहे. तसेच फोन हा 6000-सीरीज च्या एल्युमीनियम फ्रेम ने बनवण्यात आला आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला एक सिंगल एल्युमीनियम ब्लॉक मिळत आहे. फोन मध्ये तुम्हाला एक 3060mAh क्षमता असलेली बॅटरी मिळेल, त्याचबरोबर यात तुम्हाला एक 5.84-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले पण मिळत आहे, जो 19:9 आस्पेक्ट रेश्यो सह येतो.

नोकिया 7.1 मोबाइल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच यात तुम्हाला दोन वेगवेगळे रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मिळतील. फोन 3GB/4GB रॅम व्यतिरिक्त 32/64GB स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे. फोन एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो. तसेच यात तुम्हाला एंड्राइड पाई चा लवकरच अपग्रेड मिळण्याची हमी मिळते. आणि जर तुम्हाला फोनची स्टोरेज वाढवायची असेल तर तुम्ही ती माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने 400GB पर्यंत वाढवू शकता.

फोन मधील कॅमेरा पाहता, Nokia 7.1 मोबाइल फोन मध्ये तुम्हाला एक 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा प्राइमरी म्हणून मिळेल. तसेच यात तुम्हाला एक 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा पण मिळत आहे. हे दोन्ही कॅमेरा मिळून फोनला जबरदस्त फोटोग्राफ काढण्यास मदत करतात. तसेच फोन मध्ये तुम्हाला एक 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे

 

 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo