Panasonic ने Eluga Ray 700 साठी जारी केला फेस अनलॉक फीचर

Panasonic ने Eluga Ray 700 साठी जारी केला फेस अनलॉक फीचर
HIGHLIGHTS

Panasonic Eluga Ray 700 साठी फेशियल रिकोग्निशन फीचर लेटेस्ट सॉफ्टवेयर च्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे.

Panasonic ने भारतात आपल्या Eluga Ray 700 स्मार्टफोन साठी फेस अनलॉक फीचर जारी केला आहे. किया है। Panasonic Eluga Ray 700 साठी फेशियल रिकोग्निशन फीचर लेटेस्ट सॉफ्टवेयर च्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे. फेस अनलॉक सोबत यूजर्स फिंगरप्रिंट सेंसर ने पण स्मार्टफोन अनलॉक करू शकतात. 
Panasonic इंडिया चे बिजनेस हेड-मोबिलिटी डिविजन Pankaj Rana ने सांगितले, “सध्या स्मार्टफोंस मध्ये फेस रिकोग्निशन एक नवीन ट्रेंड बनला आहे. या फीचर मुळे यूजर्स फक्त फोन कडे बघून त्याला अनलॉक करू शकतात आणि हा पिन किंवा फिंगरप्रिंट सेंसर च्या तुलनेत वेगाने काम करतो. आम्ही हा फीचर आमच्या आगामी स्मार्टफोंस मध्ये सामील करणार आहोत.“ 
Panasonic Eluga Ray 700 मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात लॉन्च करण्यात आला होता. या स्मार्टफोन ची किंमत Rs 9,999 आहे. Eluga Ray 700 मध्ये 5.5 इंचाचा HD (1080×1920 पिक्सल) IPS IPS ऑन सेल डिस्प्ले देण्यात आला आहे आणि या डिवाइस मध्ये ओक्टा-कोर मीडियाटेक MTK6753 SoC आहे ज्याचा जिसकी क्लॉक स्पीड 1.3GHz आहे या फोन मध्ये 3GB रॅम 32GB स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रो SD कार्ड ने 128GB वाढवता येते. 
Eluga Ray 700 मध्ये 13 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा सेंसर आणि 13 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन एंड्राइड नौगट वर चालतो आणि डुअल सिम सपोर्ट करतो. 
याव्यतिरिक्त, Eluga Ray 700 स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे. डायमेंशन बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस चे मेजरमेंट 153.75×75.35×8.9mm आणि वजन 182 ग्राम आहे. कनेक्टिविटी साठी हा फोन 4G VoLTE, ब्लूटूथ 4.0, GPS, Wi-Fi 802.11 b/g/n, आणि 3.5mm चा हेडफोन जॅक ऑफर करतो आणि यात एक्सेलरोमीटर, एम्बिएंट लाइट सेंसर तसेच प्रोक्सिमिटी सेंसर आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo