SNAPDRAGON 710 सह OPPO RENO Z झाला लॉन्च, बघा किंमत आणि स्पेक्स

SNAPDRAGON 710 सह OPPO RENO Z झाला लॉन्च, बघा किंमत आणि स्पेक्स
HIGHLIGHTS

ड्यूल कॅमेरा सह येतो Oppo Reno Z

यूरोपीयन मार्केट मध्ये लॉन्च झाला Oppo Reno Z

Oppo Reno Z ची किंमत आहे €150

ओप्पो ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Oppo Reno Z यूरोपियन मार्केट मध्ये उतरवला आहे. हा कंपनीचा एक मिड रेंज फोन आहे जो waterdrop notch, Snapdragon 710 SoC, आणि ड्यूल कॅमेरा सेट उप सह लॉन्च केला गेला आहे. एका पाठोपाठ एक डिवाइस लॉन्च केल्यामुळे असे वाटत आहे कि Oppo ने आपली Reno लाइनअप वाढवायला सुरवात केली आहे. ओप्पो ने Reno 10x Zoom, आणि Reno 5G वेरिएंट लॉन्च केला आहे, तसेच आता Reno lineup मध्ये Reno Z पण समाविष्ट केला आहे.

OPPO RENO Z ची किंमत आणि उपलब्धता

Oppo Reno Z च्या किंमतीबद्दल बोलायचे तर हा €150 म्हणजे जवळपास 11,700 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन कंपनी यूजर्स साठी सेल साठी जून 2019 मध्ये उपलब्ध करेल. फोन दोन कलर वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात Ocean Green आणि Jet Black चा समावेश आहे. तसेच युरोपियन मार्केट व्यतिरिक्त हा इतर ठिकाणी कधी येईल याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

OPPO RENO Z चे स्पेसिफिकेशन्स

ओप्पो च्या Reno Z चे स्पेसिफिकेशन्स पाहता फोन मध्ये तुम्हाला 6.4 इंचाचा FHD+ डिस्प्ले आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 सह देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला Waterdrop Notch देण्यात आली आहे. फुल स्क्रीन डिस्प्ले बारीक बेजल्स आणि फिगरप्रिंट सेंसर सह येतात. फोन मध्ये 3950mAh ची बॅटरी, 20W VOOC 3.0 फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी सपोर्ट सह देण्यात आली आहे.

फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट सह 6GB रॅम देण्यात आला आहे. यात 128GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी साठी कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे झाले तर स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्यूल-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP Sony IMX586 प्राइमरी सेंसर सह 5MP सेकेंडरी डेप्थ सेंसर देण्यात आला आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo