Oppo R17 Pro ची किंमत झाली 6,000 रुपयांनी कमी

Oppo R17 Pro ची किंमत झाली 6,000 रुपयांनी कमी
HIGHLIGHTS

Oppo R17 Pro च्या किंमतीत 6,000 रूपयांची कपात करण्यात आली आहे आणि आता स्मार्टफोन Rs 39,990 मध्ये विकत घेता येईल.

चीनच्या स्मार्टफोन निर्माता Oppo ने आपल्या मिड-रेंज स्मार्टफोन R17 Pro च्या किंमतीत Rs 6,000 ची कपात केली आहे. हा स्मार्टफोन डिसेंबर मध्ये Rs 45,990 मध्ये लॉन्च केला गेला होता आणि आता हा स्मार्टफोन Rs 39,990 मध्ये उपलब्ध झाला आहे. Xiaomi, Samsung आणि Vivo ने आपले नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केल्यानंतर Oppo ने आपल्या या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. Xiaomi ने पण अलीकडेच आपले Redmi Note 7 आणि Note 7 Pro लॉन्च केला गेला आहे. 

Samsung ने जवळपास एका महिन्यात देशात आपले सहा स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोन्स मध्ये Galaxy M10, M20 आणि M30 तसेच Galaxy A सीरीजच्या Galaxy A10, A30 आणि A50 डिवाइसेजचा सामवेश आहे. Vivo बद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी कंपनीने भारतात Vivo V15 Pro स्मार्टफोन लॉन्च केला होता. 

Oppo R17 Pro ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म वर नवीन किंमतीत म्हणजे Rs 39,990 सह उपलब्ध आहे. 

R17 Pro च्या इतर स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर हा 6.4 इंचाच्या फुल HD+ AMOLED डिस्प्ले सह येतो ज्यात वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 91.5% आहे आणि याला कोर्निंगच्या लेटेस्ट गोरिला ग्लास 6 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. ड्यूल सिम सह Oppo R17 Pro एंड्रॉयड 8.1 ओरियो वर आधारित कलरओएस 5.2 वर चालतो. स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. युजर्सना या डिवाइस मध्ये 8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज मिळत आहे.

कॅमेरा सेट-अप पाहता, याच्या बॅक पॅनल वर तीन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. एक सेंसर 12 मेगापिक्सलचा असेल, ज्याचा अर्पचर/1.5-2.4 आहे. दुसरा सेंसर 20 मेगापिक्सलचा आहे जो अर्पचर एफ/2.6 सह येतो तर तिसरा सेंसर TOF 3D स्टीरियो कॅमेरा आहे. फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर का 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर रियर कॅमेरा सेट-अप ऑप्टिकल इमेज स्टेबलाइज़ेशन, ड्यूल पिक्सल पीडीएएफ आणि अल्ट्रा नाइट मोड सह येतो.

Oppo R17 Pro 3700 एमएएच बॅटरी सह बाजारात आला आहे जी सुपर VOOC टेक्नोलॉजी सह येईल. Oppo R17 Pro मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. कनेक्टिविटी फीचर मध्ये युजर्सना 4जी वीओएलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस/ ए-जीपीएस आणि एनएफसी सपोर्ट मिळतील. स्मार्टफोनचे डाइमेंशन 157.6×74.6×7.9 मिलीमीटर आणि वजन 183 ग्राम आहे.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo