17 डिसेंबरला लॉन्च होतील OPPO R17 आणि OPPO R17 Pro चे न्यू इयर एडिशन

17 डिसेंबरला लॉन्च होतील OPPO R17 आणि OPPO R17 Pro चे न्यू इयर एडिशन
HIGHLIGHTS

ओप्पो आपल्या OPPO R17 आणि OPPO R17 Pro डिवाइसेज चे न्यू इयर एडिशन्स शांघाई मध्ये आयोजित इवेंट मध्ये लॉन्च करण्यासाठी तयार आहे.

Oppo ने घोषणा केली आहे की 17 डिसेंबरला कंपनी आपल्या OPPO R17 आणि OPPO R17 Pro डिवाइसेजचे न्यू इयर एडिशन्स लॉन्च करेल. ओप्पोची R-सीरीज आपल्या रेड कलर साठी ओळखली जाते आणि लॉन्चच्या पोस्टर वरून संकेत मिळाले आहेत की OPPO R17 आणि OPPO R17 Pro च्या बाबतीती पण असेच काहीसे होणार आहे. पण, डिवाइसेजचे स्पेक्स रेगुलर वेरीएंट सारखेच असतील. डिवाइस शांघाई मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये लॉन्च केले जातील.

OPPO R17 स्पेसिफिकेशंस

OPPO R17 बद्दल बोलायचे तर हा डिवाइस 6.4-इंचाच्या एका गोरिला ग्लास 6 ने सुरक्षित डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. तसेच यात तुम्हाला एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण मिळत आहे. चांगली बाब अशी की स्मार्टफोन मध्ये AI क्षमता आहे. तसेच यात तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप पण देण्यात आला आहे.

फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह स्ट्रीमर ब्लू तसेच नीयन पर्पल रंगांत उपलब्ध केला गेला आहे. यासाठी प्री-आर्डर ची प्रक्रिया सुरु केली गेली होती, आणि याचा सेल 18 ऑगस्ट पासून करण्यात आला होता. फोन के कुछ इतर स्पेक्स फाटा यात तुम्हाला ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 670 प्रोसेसर मिळणार आहे, तसेच यात तुम्हाला एक ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. जो 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा एक कॅमेरा कॉम्बो असेल. जो LED फ्लश सह फोन मध्ये दिसत आहे. तसेच फोन मध्ये तुम्हाला एक 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण मिळणार आहे. फोन मध्ये तुम्हाला एक 3,500mAh क्षमता असेलली बॅटरी पण मिळत आहे. 

OPPO R17 Pro स्पेसिफिकेशंस

R17 Pro च्या इतर स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर हा 6.4 इंचाच्या फुल HD+ AMOLED डिस्प्ले सह येतो ज्यात वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 91.5% आहे आणि याला कोर्निंगच्या लेटेस्ट गोरिला ग्लास 6 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. ड्यूल सिम सह Oppo R17 Pro एंड्रॉयड 8.1 ओरियो वर आधारित कलरओएस 5.2 वर चालतो. स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. युजर्सना या डिवाइस मध्ये 8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज मिळत आहे.

 कॅमेरा सेट-अप पाहता, याच्या बॅक पॅनल वर तीन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. एक सेंसर 12 मेगापिक्सलचा असेल, ज्याचा अर्पचर/1.5-2.4 आहे. दुसरा सेंसर 20 मेगापिक्सलचा आहे जो अर्पचर एफ/2.6 सह येतो तर तिसरा सेंसर TOF 3D स्टीरियो कॅमेरा आहे. फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर का 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर रियर कॅमेरा सेट-अप ऑप्टिकल इमेज स्टेबलाइज़ेशन, ड्यूल पिक्सल पीडीएएफ आणि अल्ट्रा नाइट मोड सह येतो.

Oppo R17 Pro 3700 एमएएच बॅटरी सह बाजारात आला आहे जी सुपर VOOC टेक्नोलॉजी सह येईल. Oppo R17 Pro मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. कनेक्टिविटी फीचर मध्ये युजर्सना 4जी वीओएलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस/ ए-जीपीएस आणि एनएफसी सपोर्ट मिळतील. स्मार्टफोनचे डाइमेंशन 157.6×74.6×7.9 मिलीमीटर आणि वजन 183 ग्राम आहे.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo