Oppo F7 स्मार्टफोन नॉच डिस्प्ले सह लवकरच होऊ शकतो भारतात लॉन्च

Oppo F7 स्मार्टफोन नॉच डिस्प्ले सह लवकरच होऊ शकतो भारतात लॉन्च
HIGHLIGHTS

Oppo F7 च्या डिस्प्ले मध्ये अॅप्पल आयफोन एक्स प्रमाणे एक नॉच असू शकते.

Oppo F7 च्या रुपात ओप्पो आपल्या F-सीरीज स्मार्टफोन चा पुढील वेरियंट लॉन्च करण्यासाठी तयार आहे. कंपनी ने काही दिवसांपूर्वी आपल्या आगामी फोन चे फोटो भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या सोबत ट्वीट केले होते. 
फोटो मध्ये दिसत असलेला फोन Oppo F7 चा लुक मोठ्या प्रमाणात अफवा मध्ये राहिलेल्या स्मार्टफोन Oppo R15 सारखा आहे, Oppo R15 स्मार्टफोन लवकरच चीन मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. Oppo F7 मधील विशेषता म्हणजे याच्या डिस्प्ले मध्ये अॅप्पल आयफोन एक्स प्रमाणे एक नॉच आहे. 
कंपनी ने ट्वीट मधून फोन लवकरच लॉन्च होईल एवढच सांगितल असून इतर कोणतीही माहिती शेयर केली नहीं. पण येणार्‍या डिवाइस बद्दल येणार्‍या अफवा आणि काही रिपोर्ट्स पाहता Oppo F7 स्मार्टफोन मध्ये 19:9 एस्पेक्ट रेशियो सह 6.2 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असू शकतो. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 670 SoC वर चालेल. तसेच ही पण अफवा आहे की यात मीडियाटेक P60 चिपसेट असेल. 
इतर विशेषता म्हणजे हा फोन 25MP चा सेल्फी कॅमेरा सह येऊ शकतो, ज्यात AI फीचर, उत्तम रियल टाइम HDR आणि ब्यूटी मोड असेल. हा फोन सेल्फी च्या बाबतीत ओप्पो ची विशेषता कायम ठेवतो. या डिवाइस मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस 9 आणि असुस जेनफोन 5 प्रमाणे एनिमेटेड AR स्टिकर फीचर पण असू शकते. 

अंदाज लावला जात आहे की यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेल. ही पण शक्यता आहे की हा डिवाइस कलर ओएस 4.0 वर चालेल, जो एंड्रॉइड 8.1 ओरियो वर आधारित आहे. पण या फोन च्या लॉन्च ची अधिकृत तारीख ठरलेली नहीं नाही, पण ट्विटर कंमेट वरून असे वाटत आहे की हा फोन 26 मार्चला लॉन्च केला जाऊ शकतो.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo