Oppo F7 स्मार्टफोन चे सर्व स्पेक्स 26 मार्चला याच्या लॉन्च च्या आधीच आले समोर, या स्पेक्स सोबत केले जाऊ शकते सादर

HIGHLIGHTS

Oppo F7 स्मार्टफोन च्या बाबतित आता पर्यंत खुप माहिती समोर आली आहे आणि आता याच्या सर्व स्पेक्स समोर आले आहेत.

Oppo F7 स्मार्टफोन चे सर्व स्पेक्स 26 मार्चला याच्या लॉन्च च्या आधीच आले समोर, या स्पेक्स सोबत केले जाऊ शकते सादर

काही दिवसांपूर्वी हे समजले होते की Oppo F7 स्मार्टफोन 26 मार्चला लॉन्च केला जाऊ शकतो. या स्मार्टफोन बद्दल लीक समोर आलेले आहेत, पण आता पर्यंत आलेल्या काही लीक्स मध्ये काहीच स्पष्ट पणे समोर आले नव्हते. आपण असे ही म्हणू शकतो की या डिवाइस बद्दल जास्त माहिती समोर आली नव्हती. पण याच्या लॉन्च च्या काही दिवस आधी आलेल्या एका नवीन लीक मध्ये या स्मार्टफोन च्या सर्व स्पेक्स बद्दल माहिती मिळत आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

या वेळेस आलेल्या लीक मध्ये स्मार्टफोन बद्दल सर्वकाही समोर आले आहे, पण ही माहिती पण अजूनही एक लीक आहे, कारण कंपनी कडून याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. आता आम्ही आशा करत आहोत की 26 ला याच्या लॉन्च च्या वेळी हा याच स्पेक्स सह लॉन्च होईल. Oppo ने या स्मार्टफोन साठी मीडिया ला निमंत्रण पण दिले आहे, हा इवेंट मुंबई मध्ये 26 मार्चला होणार आहे. 

याचे स्पेक्स पाहता या स्मार्टफोन मध्ये एक 6.23-इंचाचा एक notch डिजाईन वाला LED डिस्प्ले असू शकतो. याव्यतिरिक्त Oppo ने याला सुपर फुल स्क्रीन नाव दिले आहे. ही एक FHD+ स्क्रीन आहे, जी 2280×1080 पिक्सल सह येईल. सोबतच ही 19:9 आस्पेक्ट रेश्यो सह लॉन्च केली जाऊ शकते. 

फोन मध्ये एक ओक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ P60 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. हा प्रोसेसर AI आधारित क्षमता सह येईल. याच्या कॅमेरा बद्दल बोलायाचे झाले तर Oppo अशी पहिली कंपनी आहे, जी AI आधारित सेल्फी कॅमेरा घेऊन आली आहे. या स्मार्टफोन मध्ये एक 25-मेगापिक्सल चा AI आधारित सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसेच यात एक 16-मेगापिक्सल चा एक रियर कॅमेरा पण असणार आहे. 
Via
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo