OnePlus 6 Marvel Avengers Limited Edition मध्ये पण केला जाईल लॉन्च, विडियो टीजर लीक

HIGHLIGHTS

कंपनी ने शेयर केलेल्या टीजर विडियो मध्ये OnePlus 6 Marvel Avengers Limited Edition ची झलक बघायला मिळाली आहे ज्यातून डिवाइस मध्ये 19:9 डिस्प्ले असल्याचे संकेत मिळत आहेत.

OnePlus 6 Marvel Avengers Limited Edition मध्ये पण केला जाईल लॉन्च, विडियो टीजर लीक

OnePlus ने बुधवारी आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 6 च्या लॉन्च ची तारीख स्पष्ट केली आहे, हा फोन 16 मे ला लंडन मध्ये लॉन्च केला जाईल आणि त्यानंतर भारतात आणि चीन मध्ये हा फ्लॅगशिप फोन 17 मे ला लॉन्च केला जाईल. OnePlus ने लॉन्च इवेंट साठी टिकट्स विक्री पण सुरु केली आहे आणि त्याचबरोबर OnePlus 6 च्या Marvel Avengers Limited Edition ची माहिती पण दिली आहे. OnePlus ने सांगितले आहे की हा नवीन लिमिटेड एडिशन स्मार्टफोन OnePlus 5T Star Wars च्या यशाला फॉलो करत आहे तसेच OnePlus आणि Disney मधील नाते वाढवत आहे. 
कंपनी ने शेयर केलेल्या टीजर विडियो मध्ये OnePlus 6 Marvel Avengers Limited Edition ची झलक बघायला मिळाली आहे ज्यातून डिवाइस मध्ये 19:9 डिस्प्ले असल्याचे संकेत मिळत आहेत. सोबतच या लिमिटेड एडिशन ला युनीक टेक्सचर्ड बॅक पण दिली जाईल. OnePlus आज 10 वाजल्यापासून 27, 28 आणि 29 एप्रिल साठी Avengers: Infinity War साठी आपल्या कम्युनिटी मेम्बर्सना 6000 कॉम्प्लीमेंट्री टिकट्स देईल. या टिकट्स भारतातील 10 शहरांच्या निवडक थिएटर्स साठी असतिल. या 10 शहरांमध्ये मुंबई, नवी दिल्ली, बँगलोर, चेन्नई, कोलकाता, चंडीगढ, हैदराबाद, कोची, पुणे आणि अहमदाबाद यांचा समावेश आहे, टिकट्स मिळवण्यासाठी OnePlus कम्युनिटी मेम्बर्सना oneplus.in वर जावे लागेल. 
याव्यतिरिक्त जर डिवाइस बद्दल आलेल्या लीक्स आणि रुमर्स बद्दल बोलायचे झाले तर यात एक 20-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सल चा कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. डिवाइस मध्ये 6GB/8GB रॅम सह 256GB ची इंटरनल स्टोरेज असू शकते. तसेच असे पण समोर येत आहे की या डिवाइस मध्ये एक 6.28-इंचाचा एक AMOLED डिस्प्ले असणार आहे, जो 2280×1080 पिक्सल सह येईल. डिवाइस मध्ये iPhone X प्रमाणे नॉच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. 
काही इतर रिपोर्ट नुसार हा डिवाइस Rs 33,999 च्या सुरवाती किंमतीत भारतात सादर केला जाऊ शकतो, तसेच याची किंमत Rs 48,999 पर्यंत जाऊ शकते. पण याची खरी किंमत डिवाइस च्या अधिकृत लॉन्च नंतर समोर येईल. 
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo