ONEPLUS 7 PRO लीक मधून 48 मेगापिक्सेल कॅमेऱ्याचा झाला खुलासा

ONEPLUS 7 PRO लीक मधून 48 मेगापिक्सेल कॅमेऱ्याचा झाला खुलासा
HIGHLIGHTS

स्नॅपड्रॅगॉन 855 SoC सह येऊ शकतो OnePlus 7 Pro

OnePlus च्या लॉन्च मध्ये 5G वेरिएंटका समावेश

स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus लवकरच आपला अपकमिंग फ्लॅगशिप डिवाइस OnePlus 7 Pro लॉन्च करण्यास तयार आहे. लीक रिपोर्ट्स नुसार वनप्लस 14 मे ला हा फोन लॉन्च करू शकते. स्मार्टफोन बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स आले आहेत तसेच अलीकडे या डिवाइस बद्दल अजून एक लीक समोर आला आहे.

लीक नुसार वनप्लस तीन स्मार्टफोन वेरिएंट लॉन्च करू शकते. यातील एक वेरिएंट OnePlus 7 असेल आणि बाकी दोन वेरिएंट मध्ये OnePlus 7 Pro आणि 5G वेरिएंटचा समावेश असेल. नवीन लीक नुसार 5G वेरिएंट OnePlus 7 Pro चा वर्जन असेल. लीकनुसार OnePlus 7 Pro वेरिएंटच्या कॅमेऱ्याचा पण खुलासा झाला आहे आणि यावरून असे समोर आले आहे कि डिवाइस ट्रिपल कॅमेऱ्या सेटअप सह येऊ शकतो.

ट्विटर वर एका टिपस्टर ने OnePlus 7 Pro मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपची माहिती दिली आहे. जर असे झाले तर हा कंपनीचा पहिला डिवाइस असेल जो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येईल. या ट्रिपल कॅमेरा सोबत डिवाइस मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 8-मेगापिक्सल सह 16-मेगापिक्सलचा असण्याची शक्यता आहे.

अलीकडेच कंपनीचे फाउंडर आणि CEO Pete Lau यांनी पण या अपकमिंग डिवाइसच्या लॉन्च इवेंटची माहिती दिली होती. आधीच्या काही लीक्स बद्दल बोलायचे तर डिवाइस कॉलकॉमच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 SoC सह येऊ शकतो. तसेच यात 12GB पर्यंत रॅम असेल. एका रिपोर्ट नुसार, कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोन OnePlus 7 Pro मध्ये 90Hz डिस्प्ले आणू शकते जो आधी Razer Phone मध्ये दिसला होता. तसेच आता मिळालेल्या लीक्सनुसार OnePlus 7 Pro मध्ये कंपनी पॉप अप सेल्फी कॅमेरा पण यूजर्ससाठी आणू शकते.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo