OnePlus 6T चा हा नवीन एडिशन 10GB रॅम सह होईल लॉन्च

OnePlus 6T चा हा नवीन एडिशन 10GB रॅम सह होईल लॉन्च
HIGHLIGHTS

आगामी OnePlus 6T मोबाईल फोनचा स्पेशल एडिशन 10GB रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो, हा डिवाइस OnePlus 6T MacLaren Edition म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो.

जसे OnePlus ने आपल्या इतर काही स्मार्टफोन्स सोबत पण केले आहे तसेच काहीसे कंपनी आपल्या OnePlus 6T मोबाईल फोनचा लॅव्हेंडर पर्पल एडिशन लॉन्च करून पण केले होते. तसेच आता असे समोर येत आहे कि OnePlus 6T चा एक स्पेशल एडिशन लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. हा वर्जन को MacLaren सोबत भागेदारी करून लॉन्च केला जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या फोन बद्दल माहिती पण लीक झाली आहे. असे बोलले जात आहे कि या मोबाईल फोन मध्ये 10GB चा रॅम असणार आहे. 

नुकताच OnePlus 6T मोबाईल फोनचा थंडर पर्पल कलर ऑप्शन पण भारतात लॉन्च केला गेला आहे, याआधी हा मोबाईल फोन चीन मध्ये लॉन्च केला गेला होता. OnePlus 6T मध्ये 6.41 इंचाचा ऑप्टिक AMOLED 19.5:9 डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 2340 x 1080p पिक्सल आहे आणि याची पिक्सल डेंसिटी 402 PPI आहे. स्क्रीनला नवीन कोर्निंग गोरिला ग्लास 6 प्रोटेक्शन देण्यात आले आहे आणि वनप्लस चे म्हणणे आहे कि या नवीन नॉच मुळे डिवाइसचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 86 टक्के होतो जो OnePlus 6 मध्ये 83.8 टक्के होता. OnePlus चे म्हणणे आहे कि कंपनी ने डिस्प्लेची ब्राइटनेस लेवल, कलर एक्यूरेसी आणि कलर रेंज सुधारण्यासाठी पण काम केले आहे. वनप्लस 6T क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 SoC द्वारा संचालित आहे आणि याचा क्लॉक स्पीड 2.8GHz पर्यंत आहे तसेच हा डिवाइस 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह येतो.

ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर OnePlus 6T मध्ये मागील OnePlus 6 सारखाच कॅमेरा सेटअप आहे. डिवाइसच्या रियर वर 16 आणि 20 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जे क्रमश: Sony IMX 519 आणि Sony IMX 376K सेंसर्स आहेत. 16MP च्या प्राइमरी कॅमेऱ्याचा अपर्चर f/1.7 आहे आणि हा 1.22µm पिक्सल साइज सह येतो तर दुसरा 20 मेगापिक्सलचा सेंसर f/1.7 अपर्चर आणि 1.0µm पिक्सल साइज सह येतो. 

फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचे तर हा 16 मेगापिक्सलच्या Sony IMX 371 सेंसर सह येतो ज्याचे अपर्चर f/2.0 आहे आणि हा EIS व 1.0µm पिक्सल साइज सह येतो. OnePlus 6 प्रमाणे OnePlus 6T मध्ये पण फोनच्या सेटिंग्स मध्ये जाऊन नॉच हाईड करता येते. OnePlus 6T मध्ये 3700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo