OnePlus 6 च्या रेंडर वरून झाला खुलासा, 3 कलर वेरिएंट्स मध्ये होऊ शकतो लॉन्च

OnePlus 6 च्या रेंडर वरून झाला खुलासा, 3 कलर वेरिएंट्स मध्ये होऊ शकतो लॉन्च
HIGHLIGHTS

रेंडर मध्ये नॉच आणि ग्लास बॅक ची पण माहिती मिळत आहे ज्याविषयी कंपनी स्वतः खुलासा केला आहे.

OnePlus 6 ची लॉन्च डेट जवळ येताच या फ्लॅगशिप डिवाइस बद्दल लीक्स आणि टीजर्स पण येत आहेत. आत्ताच OnePlus 6 बद्दल नवीन रेंडर आला आहे ज्यावरून डिवाइस च्या फ्रंट आणि रियर बद्दल माहिती मिळत आहे. रिपोर्ट वरून हे पण समोर येत आहे की हा डिवाइस तीन कलर वेरिएंट्स वाइट, ग्लॉसी ब्लॅक आणि स्मोक्ड ग्लास कलर मध्ये सादर केला जाईल. रेंडर मध्ये नॉच आणि ग्लास बॅक ची पण माहिती मिळत आहे ज्याविषयी कंपनी स्वतः खुलासा केला आहे. रिपोर्ट मध्ये हे पण सांगण्यात आले आहे की वेबसाइट च्या सोर्स ला सुरक्षित ठेवण्यासाठी फोटोला थोडे रीटच करण्यात आले आहे. 
रेंडर वरून समोर येत आहे की डिवाइस च्या फ्रंट ला जवळपास बेजल-लेस डिजाइन देण्यात आली आहे जी सध्या सर्व स्मार्टफोन्स मध्ये बघायला मिळते. डिवाइस मध्ये ऑन-स्क्रीन नेविगेशन बटन पण आहेत ज्याबद्दल आधी पण लीक आलेले आहेत की कंपनी Apple iPhone X प्रमाणे जेस्चर सपोर्ट फीचर ऑफर करेल. 
त्याचबरोबर रेंडर वरून समजले आहे की डिवाइस च्या बॅक वर वर्टिकल डुअल रियर कॅमेरा आहे आणि कॅमेरा सेटअप च्या खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे. रियर पॅनल च्या खालच्या भागात “Designed by OnePlus” लिहले आहे, जे कंपनी च्या टीजर मध्ये पण दिसले होते. 
हा फोन OnePlus 16 मे ला ग्लोबली लॉन्च केला जाईल आणि ग्लोबल लॉन्च च्या दुसर्‍या म्हणजे 17 मे ला हा डिवाइस भारत आणि चीन मध्ये लॉन्च केला जाईल. भारतात हा लॉन्च इवेंट मुंबई मध्ये आयोजित होईल. हा फोन भारतात खासकरून भारत Amazon वर उपलब्ध होईल आणि प्राइम मेम्बर्स साठी 21 मे 2018 ला खासकरून दुपारी 12 वाजता Amazon वर सेल साठी येईल. OnePlus 6 चा Marvel Avengers Limited Edition पण लॉन्च केला जाईल ज्याप्रकारे OnePlus 5T चा Star Wars Edition लॉन्च केला गेला होता. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo