OnePlus 6 स्मार्टफोन ची किंमत झाली लीक, 8GB रॅम, 256GB स्टोरेज मॉडल ची किंमत 749 डॉलर असण्याची शक्यता

OnePlus 6 स्मार्टफोन ची किंमत झाली लीक, 8GB रॅम, 256GB स्टोरेज मॉडल ची किंमत 749 डॉलर असण्याची शक्यता
HIGHLIGHTS

OnePlus 6 स्मार्टफोन च्या बाबतीत याआधी पण अनेकदा कित्येक लीक आलेले आहेत.

OnePlus 5T स्मार्टफोन कंपनी ने सादर केलेला असा पहिला स्मार्टफोन आहे जो 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला होता. याव्यतिरिक्त याच्या 64GB आणि 128GB स्टोरेज वेरिएंटस क्रमश: 499 आणि 559 डॉलर मध्ये सादर करण्यात आले होते. हा स्मार्टफोन मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये सादर करण्यात आला होता. आता बातमी अशी आहे की कंपनी आपल्या OnePlus 6 स्मार्टफोनला 90 टक्क्यांच्या स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह लॉन्च करू शकते, याला 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. 

असे पण समोर आले आहे की डिवाइस मध्ये नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. आता अंदाज लावला जात आहे की हा स्मार्टफोन जरा जास्त किंमतीत सादर करण्यात येईल. याबाबतीत आलेल्या एका लीक मध्ये स्मार्टफोन ची किंमत काय असेल हे सांगण्यात आले आहे. याच्या काही स्पेसिफिकेशन्स् बद्दल पण काही माहिती समोर आली आहे. 

खाली दाखवण्यात आलेल्या इमेज मध्ये तुम्ही बघू शकता हा स्मार्टफोन iPhone X, Samsung Galaxy S9+ आणि Huawei P20 Pro स्मार्टफोंस प्रमाणेच फ्लॅगशिप फोन म्हणून सादर केला जाऊ शकतो. या लीक झालेल्या इमेज मध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर मिळणार आहे. सोबतच यात एक 8GB रॅम सह 256GB ची इंटरनल स्टोरेज पण मिळणार आहे. ही या स्मार्टफोन साठी सर्वात जास्त स्टोरेज असू शकते. 

असा पण अंदाज लावला जात आहे OnePlus 6 स्मार्टफोन एका notch 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. ही बातमी सर्वात आधी एंड्राइड सेंट्रल ने सर्वांना समोर आणली आहे. ज्याप्रमाणे Oppo R15 स्मार्टफोन चा notch डिजाईन iPhone X शी खुप मिळता जुळता आहे. त्याचप्रमाणे OnePlus 6 स्मार्टफोन पण अशाच डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. 

Oppo R15 स्मार्टफोन च्या स्पेक्स पाहता या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 6.28-इंचाचा एक 2280×1080 पिक्सल वाला OLED डिस्प्ले काफी स्लिम बेजल सह बघायला मिळेल. तसेच यात एक 3450mAh क्षमता असलेल्या बॅटरी सह मीडियाटेक हेलिओ P60 प्रोसेसर पण मिळेल. पण याचा Dream Mirror Edition स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर सह लॉन्च केला गेला आहे. 

इथे Oppo R15 स्मार्टफोन आणि OnePlus 6 स्मार्टफोन मध्ये थोडीफार समानता दिसत आहे. पण सध्यातरी OnePlus 6 स्मार्टफोन लॉन्च होण्यासाठी काही वेळ जाईल. ते पाहता यात काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo