Asus Zenfone 5Z लॉन्च होताच OnePlus 6 स्मार्टफोन वर Rs 2,000 ची डिस्काउंट ऑफर

Asus Zenfone 5Z लॉन्च होताच OnePlus 6 स्मार्टफोन वर Rs 2,000 ची डिस्काउंट ऑफर
HIGHLIGHTS

Asus ने काही दिवसांपूर्वी आपला Asus Zenfone 5Z स्मार्टफोन लॉन्च केला आहे, बोलले जात आहे की या स्मार्टफोन ची टक्कर OnePlus 6 सोबत होणार आहे. आता अमेजॉन इंडिया वर OnePlus 6 स्मार्टफोन वर तुम्हाला Rs 2,000 चा डिस्काउंट दिला जात आहे. याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला समजले असेलच.

OnePlus 6 स्मार्टफोन वर अमेजॉन इंडिया ई-कॉमर्स साईट वर Rs 2,000 चा डिस्काउंट दिला जात आहे, हा डिवाइस वर HDFC बँक कडून इंस्टेंट डिस्काउंट च्या रुपात दिला जात आहे. या ऑफर ची सुरवात 4 जुलै पासून झाली होती आणि याचा लाभ तुम्ही 15 जुलै पर्यंत घेऊ शकता. तसेच या ऑफर चा लाभ तुम्ही HDFC च्या माध्यमातून EMI ट्रांजेक्शन वर पण gheu शकता. पण फक्त एकदाच हा डिवाइस विकत घेताना तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे. हि बातमी तेव्हा समोर आली जेव्हा Asus ने भारतात त्यांचा Asus Zenfone 5Z स्मार्टफोन लॉन्च केला होता. Asus ने काही दिवसांपूर्वी आपला Asus Zenfone 5Z स्मार्टफोन लॉन्च केला आहे, बोलले जात आहे की या स्मार्टफोन ची टक्कर OnePlus 6 सोबत होणार आहे. आता अमेजॉन इंडिया वर OnePlus 6 स्मार्टफोन वर तुम्हाला Rs 2,000 चा डिस्काउंट दिला जात आहे. याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला समजले असेलच. 

या ऑफर बद्दल बोलायचे झाले तर या ऑफर चा लाभ तुम्ही तेव्हाच घेऊ शकता, जेव्हा तुम्ही तुमच्या HDFC Bank मधून EMI वर जवळपास Rs 20,000 किंवा त्यापेक्षा जास्तीची खरेदी करता. अजून एक बाब म्हणजे ही ऑफर तुम्हाला फक्त 64GB आणि 128GB स्टोरेज वेरिएंट वर मिळणार आहे. 
वनप्लस 6 बद्दल बोलायचे झाले तर या फोन मध्ये एक 6.28-इंचाचा FHD+ 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे. हि एक AMOLED स्क्रीन आहे जिचे पिक्सेल रेजोल्यूशन 2280×1080 पिक्सेल आहे. याला स्लिम बॉडी डिजाइन देण्यात आली आहे. ग्लास बॅक डिवाइस च्या रेडियो ट्रांसमिशन ला वाढवते आणि स्क्रीन ला गोरिला ग्लास 5 ने प्रोटेक्शन देण्यात आले आहे. बॉक्स मध्ये तुम्हाला एक 3D नायलॉन केस पण मिळतो जो डस्ट आणि वॉटर प्रुफ आहे. 

हा डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च करण्यात आला आहे, हा क्वालकॉम ने सादर केलेला त्यांचा सर्वात लेटेस्ट फ्लॅगशिप चिपसेट आहे, जो इतर काही स्मार्टफोंस मध्ये दिसला आहे. डिवाइस मध्ये एड्रेनो 630 GPU पण आहे. फोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. डिवाइस च्या एका वेरिएंट मध्ये 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे ज्याची किंमत 34,999 रूपये आहे, तर डिवाइस च्या दुसर्‍या वेरिएंट मध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे आणि याची किंमत 39,999 रूपये ठेवण्यात आली आहे. 

फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 16-मेगापिक्सल च्या एका सेंसर व्यतिरिक्त 20-मेगापिक्सल च्या अजून एका सेंसर चा कॉम्बो आहे, याला 2X lossless झूम आणि पोर्ट्रेट मोड शॉट क्षमते सह सादर करण्यात आला आहे. तसेच या डिवाइस मध्ये एक 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. OnePlus 6 मध्ये डिवाइस च्या बॅकला वर्टीकल डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि कॅमेरा सेटअप च्या खाली एक फिंगरप्रिंट सेंसर आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo