OnePlus 5 आणि 5T ला गूगल लेंस सोबत मिळेल कॅमेरा अॅप मध्ये सुधार

OnePlus 5 आणि 5T ला गूगल लेंस सोबत मिळेल कॅमेरा अॅप मध्ये सुधार
HIGHLIGHTS

जर तुम्ही OnePlus 5 आणि 5T वर ऑक्सीजनOS बीटा बिल्ड वापरत असाल तर तुम्हाला OTA (ओवर दा एयर) च्या माध्यामातून हा अपडेट मिळेल.

OnePlus 5 and 5T will get google lens and camera improvements in new update: काही दिवसांपूर्वी OnePlus ने स्पष्ट केले होते की OnePlus 5 आणि 5T ला प्रोजेक्ट ट्रेबल सपोर्ट मिळेल आणि आता कंपनी ने या दोन्ही हॅण्डसेट साठी नवीन इंट्रेस्टिंग फीचर गूगल लेंस ची घोषणा केली आहे. लेटेस्ट ऑक्सीजन OS ओपन बीटा बिल्ड गूगल लेंस सपोर्ट आणि कॅमेरा मधील काही सुधार घेऊन येतो. 

जर तुम्ही OnePlus 5 आणि 5T वर ऑक्सीजनOS बीटा बिल्ड वापरत असाल तर तुम्हाला OTA (ओवर दा एयर) च्या माध्यामातून हा अपडेट मिळेल. अन्यथा, तुम्हाला वनप्लस ने सांगितलेल्या सुचना पाळाव्या लागतील. गूगल लेंस सपोर्ट व्यतिरिक्त, हा अपडेट उत्तम फोटो क्लॅरिटी आणि ऑप्टीमाईजेशन सह येऊ शकतो, ज्यामुळे ऑइल पेंटिंग इफेक्ट कमी करता येईल. 

काही दिवसांपूर्वी कंपनी ने दोन्ही डिवाइस साठी नवीन अपडेट दिले होते, या अपडेट्स मध्ये सॉफ्टवेर मधील सुधार आणि बग फिक्स सोबत, OnePlus ने दोन्ही स्मार्टफोन्स साठी नवीन टच जेस्चर पण दिला आहे. ज्यामुळे यूजर्स स्क्रीन वर डबल टॅप करून स्क्रीन लॉक करू शकतात. हे नवीन फंक्शन लॉन्चर सेटिंग मध्ये उपलब्ध आहे, जो अपडेट मिळाल्या नंतर तुम्हाला इनेबल करावा लागेल. OnePlus नुसार, हा ओपन बीटा अॅप ड्रावर 40 सर्च हिस्ट्री मध्ये पण सुधार आणेल. 

OnePlus 5 मधील फीचर्स पाहता यात 5.5-इंचाचा 1080p AMOLED डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन दोन वेरियंट मध्ये येतो, 6GB रॅम सह 64GB इंटरनल स्टोरेज आणि 8GB रॅम सह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन मेटल बॉडी डिजाइन सह सादर करण्यात आला आहे. हा मिडनाइट ब्लॅक आणि स्लेट ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोन मधील कॅमेरा सेटअप पाहता यात दोन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. पहिला कॅमेरा 16MP वाइड -एंगल लेंस आहे आणि दुसरा 20MP टेलीफोटो लेंस आहे. यात 4G VoLTE, NFC, ब्लूटूथ सारखे फीचर्स पण आहेत. यात 3300mAh ची बॅटरी पण आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo